Mallikarjun Kharge invited Sharad Pawar for the swearing ceremony
Mallikarjun Kharge invited Sharad Pawar for the swearing ceremonyesakal

Karnataka Politics: काँग्रेसविरुद्ध लढणाऱ्या पवारांना खर्गेंचा थेट फोन; काय आहे कारण?

ऐतिहासिक विजयानंतर काँग्रेसकडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाच्या नावांची घोषणा
Published on

Karnataka Politics News: कर्नाटकात कॉंग्रेस विरुद्ध लढणारे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार सिद्धरामय्यांच्या शपथविधीला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. (Mallikarjun Kharge invited Sharad Pawar for the swearing ceremony )

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या ऐतिहासिक विजयानंतर काँग्रेसकडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाच्या नावांची घोषणा झाली असून सिद्धरमैय्या हेच कर्नाटकचे मुख्यमंत्री होणार आहेत. तर, डीके शिवकुमार यांना सध्यातरी उपमुख्यमंत्रीपदाचीच खुर्ची सांभाळावी लागणार आहे.

Mallikarjun Kharge invited Sharad Pawar for the swearing ceremony
Karnataka CM: घोषणा झाली ! कर्नाटकचे किंग सिद्धरामय्याच; डीके शिवकुमारांचं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न हुकलं..

दरम्यान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाच्या नावांची घोषणेनंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी थेट शरद पवार यांना फोन केला आणि शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण दिले.

Mallikarjun Kharge invited Sharad Pawar for the swearing ceremony
Maharashtra Politics: कर्नाटकात दिसला आरक्षण फॅक्टर, महाराष्ट्राचं काय? मराठी मुस्लिमांची भूमिकाही महत्त्वाची

शपथविधी सोहळा २० मे रोजी दुपारी १२.३० वाजता होणार आहे. त्यासाठी, देशातील काँग्रेसचे मुख्यमंत्री, वरिष्ठ पदाधिकारी, सर्वच राज्यांचे प्रदेशाध्यक्ष आणि गांधी कुटुंबीयांना निमंत्रण देण्यात येणार आहे. तसेच, शपथविधी सोहळ्यासाठी महाविकास आघाडीतील कोणा-कोणत्या नेत्यांना निमंत्रित केले जाईल, हे पाहणे उस्तुकत्याचे ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()