Lok Sabha Election : पंतप्रधान पदासाठी माझी पसंती....; राहुल, प्रियांका गांधीबद्दल मल्लिकार्जुन खर्गेनी बोलून दाखवली इच्छा

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीचा अखेरचा टप्पा शिल्लक असून आता देशातली सर्वांच लक्ष लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे लागले आहे.
Lok Sabha Election
Lok Sabha Election
Updated on

लोकसभा निवडणुकीचा अखेरचा टप्पा शिल्लक असून आता देशातली सर्वांच लक्ष लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे लागले आहे. यादरम्यान महाविकास आघाडीकडून अद्याप पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर करण्यात आला नाहीये. याबद्दल सत्ताधारी भाजपकडून वेळोवेळा टीका देखील करण्यात आली आहे. यादरम्यान आता काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी लोकसभा निवडणुकीत विजय मिळाल्यावर पंतप्रधान पदासाठी त्यांची पसंती कोणाला असेल याबद्दल भाष्य केले आहे.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी जर इंडिया आघाडीने लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत केलं तर राहुल गांधी हे नरेंद्र मोदींनंतर पंतप्रधान पदावर बसले पाहीजेत असे मत व्यक्त केले आहे.

तसेच खर्गे पुढे बोलताना म्हणाले की, त्यांनी प्रियंका गांधी यांनी देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा आग्रह केला होता. मात्र प्रियंका गांधी यांनी तो प्रस्ताव फेटाळला. प्रियांका गांधी रायबरेली येथून निवडणूक लढवण्याची शक्यता आसल्याचे बोलले जात होते, येथून सोनिया गांधी सलग पाच वेळा जिंकून आल्या होत्या. मात्र प्रियंका गांधी यांनी यासाठी नकार दिला त्यानंतर राहुल गांधी येथून निवडणूकीच्या रिंगणात उभे आहेत.

Lok Sabha Election
Arvind Kejriwal News : कितीही छळ केला तरी ‘झुकेगा नही’; तुरुंगात जाण्यापूर्वी केजरीवालांची भावनिक साद

एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना खर्गे म्हणाले की, राहुल गांधी पंतप्रधान पदासाठी एक लोकप्रिय पर्याय ठरतील. खर्गे म्हणाले की, पंतप्रधान पदासाठी माझी पसंती राहुल गांधी यांना आहे.... त्यांना माझी पसंती तर आहेत सोबतच ते तरुण आणि संपूर्ण देशाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. यापूर्वी खर्गे यांनी अनेकवेळा राहुल गांधी हे पंतप्रधान पदाचे उमेदवार असण्याबाबत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देणे टाळले होते. यावेळी देखील खर्गे यांनी नवीन पंतप्रधान तेव्हाच निवडणला जाईल जेव्हा इंडिया आघाडी जिंकेल आणि पंतप्रधान पदाचा उमेदवार सर्वांच्या संमतीने निवडणला जाईल

Lok Sabha Election
Lok Sabha Elections 2024: फलोदी ते सुरत, भारतातील 10 प्रमुख सट्टा बाजार कोणाच्या बाजूने? कोणाला मिळणार बहुमत?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.