Mallikarjun Kharge: घराणेशाही संपली; खरगे आज काँग्रेस अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारणार

याआधी सीताराम केसरी हे बिगर गांधी अध्यक्ष होते
Mallikarjun Kharge
Mallikarjun KhargeEsakal
Updated on

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आज दिल्लीतील अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटी मुख्यालयात पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर हे दोघे अध्यक्षपदाच्या शर्यतीत होते. यामध्ये मल्लिकार्जुन खर्गे विजयी झाले आहेत. या निवडणुकीमुळे काँग्रेसला दोन दशकांहून अधिक काळानंतर प्रथमच गांधी घराण्याबाहेरील अध्यक्ष मिळाला आहे. शशी थरूर यांना 1072 मत मिळाली आहेत. तर मल्लिकार्जुन खरगे यांना 7898 मत मिळाली होती.

काँग्रेसच्या 137 वर्षाच्या इतिहासात सहाव्यांदा अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली आहे. काँग्रेस पक्षनेते 2019 पासून ज्याची वाट पाहात होते, ते अध्यक्ष आज पक्षाला मिळाले आहेत. राहुल गांधी यांनी 2019 मध्ये काँग्रेसचं अध्यक्षपद सोडलं होतं. त्यानंतर सोनिया गांधी हंगामी अध्यक्ष म्हणून काम बघत होत्या मात्र पक्षाची देशभरातील एकंदरीत स्थिती पाहता पक्षाचं नेतृत्व करण्यासाठी अध्यक्ष असणं गरजेचे असल्याचे वेळोवेळी दिसून आलं आहे.

Mallikarjun Kharge
Congress President Election: काँग्रेसमध्ये 24 वर्षानंतर घराणेशाही संपली; मल्लिकार्जुन खर्गे काँग्रेसचे नवे अध्यक्ष

अध्यक्षांची मागणी होताना अध्यक्ष गांधी घराण्यातीलच व्हावा अशी अनेकांची इच्छा होती, मात्र राहुल गांधींचा अध्यक्षपद स्वीकारण्यासाठीचा नकार, सोनिया गांधी यांची खालावलेली तब्येत आणि प्रियांका गांधी वड्रा यांच्या हाती फारसं यश न लागणं यासर्व गोष्टींमुळे 'नॉन-गांधी' हाच एक पर्याय पक्षाकडे राहिला होता.

24 वर्षांनंतर काँग्रेसला गांधी कुटुंबाबाहेरचा अध्यक्ष मिळाला आहे. याआधी सीताराम केसरी हे बिगर गांधी अध्यक्ष होते. यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता.

Mallikarjun Kharge
Mallikarjun Kharge: काँग्रेसचे बंडखोर ते काँग्रेस अध्यक्ष, खर्गेंचा प्रवास

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.