कुपोषण, लैंगिक असमानता चिंताजनक

राष्ट्रपतींचे प्रतिपादन ‘एसडीजी’ उद्दिष्टांची पूर्तता आवश्‍यक
कुपोषण
कुपोषण sakal
Updated on

नवी दिल्ली : बालकांचे कुपोषण, लैंगिक असमानता, पिण्याचे स्वच्छ पाणी या समस्यांबाबत उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी चिंता व्यक्त करतानाच सतत विकास उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी (एसडीजी) भारताने २०३० च्या कार्यक्रम पत्रिकेनुसार आखणी करून प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.

राज्यसभेत आज गदारोळामुळे शून्य प्रहराचे कामकाज चालू शकले नाही. नायडू यांनी सुरवातीला वाचण्यासाठी निवेदन तयार केले होते. त्यात त्यांनी म्हटले आहे की भारताच्या विकासाच्या मार्गात कुषोषण, लैंगिक असमानता, प्रदूषण आदी मोठे अडथळे आहेत. प्रदूषणाची समस्या जागतिक असून पृथ्वीला वाचविण्यासाठी सामूदायिक परयत्नांची व त्यातील सातत्याची नितांत गरज आहे.‘वसुधैव कुटुम्बकम’ हा भारतीय विचार आजही साऱ्या जगासाठी तेवढाच अनुकरणीय आहे. सतत विकास उद्दिष्ट सूचकांक-२०२१ मध्ये भारत १२० व्या क्रमांकावर असल्याबद्दल नायडू यांनी गंभीर चिंता व्यक्त केली. फिनलॅंड, स्वीडन व डेन्मार्क सारखे देशही या यादीत भारताच्या वर आहेत. हा असा मुद्दा आहे की जो भारतीयांनी गंभीरपणे घेतला पाहिजे.

दरम्यान, भारतीय इतिहास व त्यातील नायकांचे तटस्थ व वस्तुस्थितीजन्य परिक्षण वारंवार होणे गरजेचे असल्याचेही नायडू म्हणाले. भारतीय इतिहास संशोधन परिषदेच्या (आयसीएचआर) कार्यक्रमात बोलताना नायडूंनी सांगितले की एतिहासिक सत्य उजेडात आणण्यासाठी इतिहासाची परीक्षण प्रक्रिया सतत चालली पाहिजे.

नवा ‘लूक’

संसदेत (राज्यसभा) गदारोळाच्या व्यतिरिक्त अनेकदा हास्यविनोदाचेही परसंग घडतात. यामुळे तप्त वातावरणात काहीसा बदल होतो. राज्यसभाध्यक्ष वेंकय्या नायडू यांच्या नजरेतून सदस्यांच्या वेषभूषेत किंवा हालचालींमध्ये बदल झाला तरी सुटत नाही. दाक्षिणात्य अभिनेते, खासदार सुरेश गोपी आज एक अहवाल सभापटलावर ठेवण्यासाठी उठले तोच नायडू यांनी त्यांना, तुमची ही दाढी आहे का मास्क?असे विचारले. त्याबरोबर सभागृहात हास्याचे फवारे उडाले. गोपी यांनी सांगितले की त्यांच्या आगामी मल्याळी चित्रपटासाठी केलेला हा नवा ‘लूक’ आहे. त्यावर नायडूंनी, ठीक आहे, वाचा असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.