Opposition Party Meeting:विरोधकांच्या युतीला INDIA नाव देण्याचा प्रस्ताव कोणाचा, इंडिया नावावरुन नितीश कुमार नाराज?

BJP vs I.N.D.I.A :विरोधकांच्या युतीला INDIA नाव देण्याचं श्रेय नेमकं कोणाचं, नितीश कुमार यांना का आहे इंडिया नावावर आक्षेप?
INDIA
INDIA Esakal
Updated on

2024 Election Opposition Meeting: २०२४च्या निवडणूकांमध्ये भारतीय जनता पक्षाचा सामना करण्यासाठी विरोधी पक्ष एकजूट करण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी १७ आणि जुलैला बंगळूरमध्ये कॉंग्रेसने विरोधी पक्षांची बैठक बोलावली होती.

या बैठकीत २६ राजकीय पक्षांचे नेते सामील झाले होते. या बैठकीत २०२४च्या निवडणूकीसाठी तयार झालेल्या या युतीला विरोधकांनी I.N.D.I.A म्हणजेच इंडियन नॅशनल डेवलपमेंट इन्क्ल्यूसिव्ह अलाअन्स असं नाव दिलंय.

महत्वाची गोष्ट ही आहे की या युतीचं नावं I.N.D.I.A ठेवण्यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राहुल गांधी यांची महत्वाची भूमिका होती.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विरोधकांच्या या बैठकीत त्यांच्या युतीचं नाव तृणमूल कॉंग्रेसच्या पक्ष प्रमुख ममता बॅनर्जी यांनी सुचवलंय. मात्र, त्यानंतर INDIA च्या विस्तृत रुपावर चर्चा करण्यात आली आणि त्याचा फुल फॉर्म इंडियन नॅशनल डेवलपमेंट इन्क्लुसिव अलायंस असं निश्चित करण्यात आलं.

युतीचं नाव निश्चित झाल्यानंतर कॉंग्रेस प्रवक्ते सुप्रिया श्रीनेत म्हणाले की हा एक सामुहिक प्रयत्न होता. मला नाही वाटतं की आम्ही याचं श्रेय घेतोय, पण हो, हा विचार राहुल गांधी यांच्याकडून आला आहे.

INDIA
Kirit Somaiya विरोधात काँग्रेस आक्रमक; सोमय्यांची प्रतिमा पायदळी तुडवत महिलांनी मारले जोडे

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नितीश कुमार यांनी बैठकीत ठरलेल्या INDIA नावावर आक्षेप घेतला आहे. ते म्हणाले की या नावाचा काय अर्थ आहे ?असं मानल्या जातंय की नितिश कुमार यांना इंग्रजी नावावरुन अडचण होती.

अशाही गोष्टी समोर येतायेत की कॉग्रेस पक्षाकडून युतीचं नाव ठरवण्यावर कोणतीही चर्चा करण्यात आलेली नाही, अशातच नितीश कुमार याच्यावरही नाराज आहेत. जर राजकीय जानकारांचं मत पाहिलं तर विरोधी पक्षांना एकत्र आणण्यात नितीश कुमार यांची महत्वाची भूमिका होती.

मात्र, ज्या पद्धतीने कॉंग्रेसने या युतीवर वर्चस्व निर्माण केलंय, त्यावर जदयू आणि आरजेडी नेते नाराज आहेत. एवढंच नव्हे तर नितीश कुमार, लालू प्रसाद यादव आणि तेजस्वी यादव बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सामील नाही झाले.

INDIA
Kirit Somaiya : 'महिलांनी मारले जोडे; शिवसैनिकांनी फासले काळे', किरीट सोमय्या कथित व्हिडिओवरून सेनेचे आंदोलन

राहुल गांधींनी सांगितलं नावामागचं कारण

राहुल गांधी यांनी बैठकीनंतर सांगितले की युतीला इंडिया नाव का देण्यात आलं. ते म्हणाले की ही लढाई विरोधक आणि भारतीय जनता पक्षामध्ये नाहीये.

ही लढाई भाजपची विचारधारा आणि त्यांच्या विचारांच्या विरोधात आहे. ते देशावर हल्ला करत आहे. बेरोजगारी सर्वत्र पसरतं आहे. ही लढाई देशासाठी असल्याने या युतीचं नाव इंडियन नॅशनल डेवलपमेंट इन्क्लुसिव अलायंस (INDIA)निवडण्यात आलं.

INDIA
Mumbai Local Live Update: पनवेलला जाणाऱ्या गाड्या बंद, पाणी साचल्याने बदलापूर आणि अंबरनाथमधील वाहतूक ठप्प

मुंबईमध्ये ठरणार युतीचा अध्यक्ष

युतीची पुढची बैठक मुंबईमध्ये होऊ शकते. बंगळूर येथील बैठकीत सल्ला देण्यात आला होता की या युतीचा एक अध्यक्ष असावा. सांगण्यात येतंय की या मुद्द्यावर मुंबईतील बैठकीत निर्णय घेतला जाईल आणि एकाचे नाव निश्चित करण्यात येईल.

जीतेगा भारत

युतीचं नाव इंडिया ठेवल्यानंतर टॅगलाई जीतेगा भारत अशी ठेवण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाला २०२४च्या लोकसभा निवडणूकांमध्ये पराभूत करणं हे या युतीचं लक्ष्य आहे. जीतेगा भारत या टॅगलाईनवर मंगळवारी रात्री उशीराने निर्णय घेण्यात आला. टॅगलाईन विविध प्रादेशिक भाषांमध्यही दाखवण्यात येईल.

INDIA
Ajit Pawar: दिल्लीमध्ये PM मोदी, अजित पवार आणि अमित शाह यांच्यात बंद दाराआड चर्चा; एकनाथ शिंदे...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.