ममतांचा अफाट राग, वाजपेयींच्या टेबलवर ठेवली मानवी हाडे अन् कवटी; काय आहे किस्सा?

Mamata Banerjee : ममता या भारतीय जनता पक्षाच्या कट्टर विरोधक आहेत. पण, असाही काळ होता जेव्हा त्या एनडीए सरकारमध्ये मंत्री होत्या.
atal bihari Vajpayee Mamata
atal bihari Vajpayee Mamata
Updated on

नवी दिल्ली- तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी या कणखर नेत्या म्हणून ओळखल्या जातात. त्या भारतीय राजकारणातील सर्वात यशस्वी महिला राजकारणी आहेत. ममता सुरुवातीला काँग्रेस पक्षामध्ये होत्या. पण, त्यांनी 'एकला चलो चा' मार्ग निवडला. १९९८ मध्ये त्यांनी तृणमूल काँग्रेस या स्वतंत्र पक्षाची स्थापना केली. गेल्या १४ वर्षांपासून पश्चिम बंगालमध्ये सत्तेत आहेत.

ममता या भारतीय जनता पक्षाच्या कट्टर विरोधक आहेत. पण, असाही काळ होता जेव्हा त्या एनडीए सरकारमध्ये मंत्री होत्या. ममता या वाजपेयी सरकारमध्ये रेल्वेमंत्री होत्या. त्या आपल्या कठोर आणि हट्टी स्वभावासाठी ओळखल्या जायच्या. मंत्रिमंडळाचा विस्तार असो किंवा देशातील पेट्रोल-डिझेलच्या वाढल्या किंमती असो. त्या नेहमी तक्रार करायच्या. त्यांची समजूत काढण्यासाठी एकदा जॉर्ज फर्नांडिस कोलकात्याला आले होते. पण, त्यांची ममतांसोबत भेट झाली नाही.

atal bihari Vajpayee Mamata
नाशिककरांनी बिनविरोध निवडून दिलं अन् यशवंतराव चव्हाणांनी त्यांचं ऋण फेडलं; काय आहे किस्सा? जाणून घ्या

टीएमसीचे ११ समर्थक मारले गेले होते

एकदा स्वत: तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे ममता यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या कोलकातामधील घरी पोहोचले. पण, ममता घरी नव्हत्या. वाजपेयींनी ममतांच्या आईचे चरणस्पर्श केले. ते आईला म्हणाले की, तुमची मुलगी खूप हट्टी आहे. आम्हाला खूप सतावते. यानंतर ममता यांचा राग क्षणार्धात कमी झाला होता.

२००१ च्या पश्चिम बंगालमधील एका घटनेने ममता यांच्या रागाचा स्फोटच झाला. हामिद नापूरमधील छोटा अंगाडिया भागामध्ये हिंसा झाली होती. यात टीएमसीचे ११ समर्थक मारले गेले होते. सीपीएमने हे काम केल्याचा आरोप होता. ममतांनी पश्चिम बंगालमधील डाव्यांचे सरकार विसर्जित करण्याची मागणी केली होती. पण, अडवाणी सरकारने याला प्रतिसाद दिला नव्हता.

atal bihari Vajpayee Mamata
Sugar Mills: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदे सरकारने 21 साखर कारखान्यांना दिली कर्जाची हमी, महायुतीच्या नेत्यांना फायदा?

ममतांच्या कृतीमुळे वाजपेयी हैराण

ममता या वाजपेयींना भेटण्यासाठी दिल्लीत पोहोचल्या. त्यांनी आपल्या झोळीमधून मानवी हाडं आणि कवटी बाहेर काढली आणि वाजपेयींच्या टेबलवर ठेवली. वाजपेयी हैराण झाले. वाजपेयी ममतांना म्हणाले की, राष्ट्रपती राजवट लावणे हे गृहमंत्रालयाचे काम आहे. त्यांच्या शिफारशीनंतरच कॅबिनेटमध्ये निर्णय होईल. त्यासाठी तुम्ही लालकृष्ण अडवाणींना भेटा. ममता अडवाणींना भेटल्या. अडवाणींनी सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.