India Alliance : आघाडीत बिघाडी? 'इंडिया'तील जागावाटपावरून ममता बॅनर्जी नाराज? राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Mamta Banerjee
Mamta BanerjeeSakal
Updated on

आगामी लोकसभा निवडणूक २०२४ साठी विरोधकांकडून जोरदार तयारी केली जात आहे. यासाठी इंडिया आघाडीकडून बैठका घेत रणनिती ठरवली जात आहे. अशीच एक बैठक नुकतीच मुंबईत पार पडली. या दरम्यान तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बैठकीत लोकसभा निवडणुकीचा जाहीरनामा लवकर अंतिम करण्याचा मुद्दा उपस्थित केला.

त्यांनी जागावाटपासह अन्य काही मुद्यांवर संथ गतीने होत असल्याबद्दल ही नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. बॅनर्जी आणि त्यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांनीही इंडिया आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेला हजेरी लावली नाही. तेव्हापासून विरोधी आघाडीत सर्व काही सुरळीत नसल्याची चर्चा सुरू झाली आहेत. मात्र, हे दोघे पूर्वनियोजित कार्यक्रमात सहभागी झाल्याने ते पत्रकार परिषदेला उपस्थित राहिले नसल्याचे टीएमसीने म्हटले आहे.

या बैठकीत ममता बॅनर्जी यांनी लोकसभा निवडणुकीचा जाहीरनामा लवकर तयार करावा, जेणेकरून तो लोकांपर्यंत पोहोचेल, अशी सूचना केली, पण त्यांच्या प्रस्तावाला इतर पक्षांचा फारसा पाठिंबा मिळाला नाही. त्यानंतर महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी म्हणजेच २ ऑक्टोबरला निवडणूक प्रचाराला सुरुवात करता यावी, यासाठी एक छोटासा अजेंडा तयार करावा, असा आग्रह त्यांनी धरला. जागावाटपाबाबत लवकराात लवकर चर्चा व्हावी, अशी ही टीएमसीची इच्छा आहे, असे एका नेत्याने सांगितले.

Mamta Banerjee
Jalna Violence : शब्द न पाळल्याने आंदोलन चिघळले; शरद पवार यांचा आरोप, न्यायालयीन चौकशीची मागणी

२८ पक्षांच्या आघाडीतील १५ हून अधिक छोट्या संघटनांना एकत्र ठेवण्यासाठी मोठ्या पक्षांनी हुशारीने काम करणे गरजेचे आहे, असे दोन ज्येष्ठ नेत्यांनी नाव न जाहीर करण्याच्या अटीवर सांगितले. वरिष्ठ नेत्यांनी समन्वय चांगल्या प्रकारे हाताळत आहेत. कामकाज सुरळीत पार पाडण्याची जबाबदारी आता पॅनल सदस्यांची आहे असेही एका नेत्याने सांगितले. हिंदुस्तान टाइम्सने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

विरोधी आघाडीने निवडणूक प्रचार समिती आणि सोशल मीडियासाठी कार्यगटासह पाच पॅनेल तयार केले आहेत. यांच्या माध्यमातून पुढील आठवड्यापासून कामाला सुरुवात होण्याची शक्यता नेत्यांनी व्यक्त केली. जागांबाबतही लवकरच वाटाघाटी सुरू होण्याची शक्यता आहे.

Mamta Banerjee
India Alliance: ‘इंडिया’आघाडीसाठी फॉर्म्युला ‘महाराष्ट्रा’चा; लोकसभेच्या चारशे जागांचे वाटप मविआ तोडग्याने?

२०२४ च्या निवडणुकीत युतीच्या शक्यतेसाठी हे महत्त्वाचे पाऊल असल्याने विविध राज्यांतील जागावाटपाच्या व्यवस्थेबाबत काळजी घ्यावी लागेल, असे नेत्यांनी सांगितले. जागावाटपाच्या चर्चेत दोन पैलू असतील, असेही ते म्हणाले. पहिला म्हणजे सर्वसामान्य उमेदवारांची संख्या जास्तीत जास्त वाढवणे आणि जास्तीत जास्त राज्यांमध्ये मैत्रीपूर्ण लढती टाळण्याचा प्रयत्न करणे.

पश्चिम बंगाल, पंजाब आणि केंद्रशासित प्रदेश दिल्लीसारख्या राज्यांमध्ये जम्मू-काश्मीरसारख्या राज्यांमध्ये इंडिया अलायन्सच्या प्रमुख भागीदारांमध्ये जोरदार चर्चा होऊ शकते. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने सत्ताधारी तृणमूल काँग्रेससोबत आघाडी करता येणार नसल्याचे म्हटले आहे.

तर दिल्ली आणि पंजाब मध्ये काँग्रेस पक्ष आप सोबत युतीएवजी स्वबळावर निवडणूक लढण्यासाठी प्रयत्न करत आहे. काँग्रेसवर इतर पक्षांना सामावून घेण्यासाठी दबाव आहे, बंगळुरू आणि मुंबईमधील बैठकीत लालू प्रसाद यादव, डी राजा आणि उद्धव ठाकरे यांच्यासारख्या विरोधीपक्षनेत्यांना मोठं मन दाखवण्याचा आग्रह करण्यात आला. दरम्यान अनेक विरोधीपक्ष नेत्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी इंडिया आघाडीला आश्वासन दिलं आहे की काँग्रेस सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()