Mamata Banerjee : काँग्रेस-माकपची भाजपला साथ असल्याची टीका; ममतांचा नाराजीचा सूर

काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष पश्‍चिम बंगालमध्ये भाजपबरोबर हातमिळवणी करत असल्याची टीका मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे.
mamata banerjee
mamata banerjeesakal
Updated on

कूचबिहार (पश्‍चिम बंगाल) - आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी १५ राजकीय पक्षांनी बैठक घेत एकजुटीचा नारा दिल्याच्या घटनेला एक आठवडाही उलटला नसतानाच या महाआघाडीमधून नाराजीचा सूर उमटला आहे.

काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष पश्‍चिम बंगालमध्ये भाजपबरोबर हातमिळवणी करत असल्याची टीका मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे. भाजप विरोधकांच्या या आघाडीत तृणमूल काँग्रेसला महत्त्वाचे स्थान असल्याने ममता यांच्या टीकेला महत्त्व आले आहे.

भाजपच्या हुकमशाही वृत्तीविरोधात आणि लोकशाही मूल्यांचे संरक्षण करण्यासाठी आम्ही एकत्र आलो असल्याचे महाआघाडीतील पक्षांनी पाटण्यात नुकत्याच झालेल्या बैठकीत सांगितले होते. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, भाकप, माकप, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, राष्ट्रीय जनता दल यांच्यासह १५ पक्षांचे प्रमुख उपस्थित होते.

mamata banerjee
Kusha Kapila Influencer : सहा वर्षांनंतर कुशा कपिला नवऱ्यापासून वेगळी होतेय; स्वतःच पोस्ट करुन सांगितलं

या बैठकीत भाजपच्या विचारसरणीला एकजुटीने विरोध करण्याबाबत चर्चा झाली. मात्र, ही बैठक होऊन अद्याप एक आठवडाही झाला नाही तोच ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस आणि माकपवर टीका केली आहे. ‘‘केंद्रात भाजपविरोधातील आघाडीत सहभागी होणारे काँग्रेस आणि माकप हे पश्‍चिम बंगामध्ये मात्र भाजपबरोबर हातमिळवणी करत आहेत,’’ अशी टीका ममता बॅनर्जी यांनी सोमवारी केली.

पश्‍चिम बंगालमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनिमित्त सोमवारी कूचबिहार येथे आयोजित प्रचारसभेदरम्यान ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस आणि माकपवर दुटप्पीपणाचा आरोप केला. ममता म्हणाल्या, ‘आम्ही केंद्रातील भाजप सरकारविरोधात महाआघाडी बनवत आहोत, मात्र पश्‍चिम बंगालमध्ये माकप आणि काँग्रेस हे भाजपबरोबर काम करत आहेत.

mamata banerjee
EPFOचा दिलासा! हायर पेन्शनच्या अर्जासाठी पुन्हा मुदतवाढ; जाणून घ्या काय आहे नवी तारीख

पश्‍चिम बंगालमधील त्यांच्या या छुप्या आघाडीची मनोरथे मी यशस्वी होऊ देणार नाही.’ मागील दहा दिवसांत ममता बॅनर्जी यांनी दुसऱ्यांदा काँग्रेस आणि माकपवर टीका केली आहे. भाजपसह हे दोन्ही पक्ष तृणमूल काँग्रेसचे प्रमुख विरोधी पक्ष आहेत.

वास्तविक पाहता, भाजपच पश्‍चिम बंगालमधील जनताविरोधी सरकारशी लढा देत आसून; तृणमूल, माकप आणि काँग्रेस हे एकाच माळेचे मणी आहेत.

- राहुल सिन्हा, भाजपचे नेते

‘ममतांनी उपदेश करू नये’

ममता यांच्या आरोपाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अधीररंजन चौधरी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘भाजपविरोधातील लढ्यात तृणमूलचे कितपत योगदान आहे, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे,’ असा टोला चौधरी यांनी मारला आहे. माकपने देखील, ‘भाजपविरोधात कसे लढायचे, याचा उपदेश ममता यांनी करण्याची गरज नाही,’ असे सुनावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.