Mamata Banerjee Head Injury: ममता बॅनर्जींच्या कपाळावर पडले तीन टाके; ईसीजी-सीटी स्कॅननंतर रुग्णालयातून दिला डिस्चार्ज

Mamata Banerjee Head Injury: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. डोक्याला दुखापत झाल्यामुळे त्या सध्या निरीक्षणाखाली आहेत.
Mamata Banerjee Head Injury
Mamata Banerjee Head InjuryEsakal
Updated on

Mamata Banerjee Head Injury: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. डोक्याला दुखापत झाल्यामुळे त्या सध्या निरीक्षणाखाली आहेत. राज्य सरकार संचालित एसएसकेएम रुग्णालयाचे संचालक डॉ. मनिमॉय बंदोपाध्याय यांनी ही माहिती दिली आहे. घरी ट्रेडमिलवर चालतेवेळी कोसळल्यामुळे मुख्यमंत्री बॅनर्जी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले.

रुग्णालयाचे संचालक डॉ. मनिमॉय बंदोपाध्याय यांनी गुरुवारी (14 मार्च) रात्री प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, ममता बॅनर्जी यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. त्यांनी पुढे सांगितले की, मुख्यमंत्र्यांना मागून धक्का लागला, त्यामुळे त्या कोसळल्या. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयाच्या संचालकांनी सांगितले की, डॉक्टरांनी त्याच्या कपाळावर तीन टाके घातले आणि नाकावरही एक टाका घालण्यात आला आहे, जिथून रक्त वाहत होते.

Mamata Banerjee Head Injury
Petrol Price: लोकसभेच्या तोंडावर मोदी सरकारचा मोठा निर्णय! पेट्रोल दोन रुपयांनी स्वस्त, कोणत्या शहरात कसे असतील दर?

डॉ. मनिमॉय बंदोपाध्याय म्हणाले, 'आम्हाला संध्याकाळी साडेसातच्या सुमारास मुख्यमंत्र्यांची माहिती मिळाली की, मागून धक्का लागल्याने त्या घरात कोसळल्या आहेत. त्यांच्या कपाळावर आणि नाकावर दुखापत झाली आहे. त्यामुळे खूप रक्तस्त्राव झाला होता. ते पुढे म्हणाले की, "रुग्णालयातील एचओडी न्यूरोसर्जरी, एचओडी मेडिसिन आणि कार्डिओलॉजिस्ट यांनी ममता बॅनर्जींची तपासणी केली. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच, सर्व आवश्यक तपासण्या करुन त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

Mamata Banerjee Head Injury
Ayodhya Ram Mandir: पैसे देऊन राम मंदिरात कोणतेही व्हीआयपी दर्शन नाही, ट्रस्टचे स्पष्टीकरण...

रुग्णालयाचे संचालक म्हणाले, 'मुख्यमंत्र्यांच्या कपाळावर तीन टाके घालण्यात आले आणि त्यांच्या नाकाला एक टाके घालण्यात आले आणि आवश्यक ड्रेसिंग करण्यात आले. ईसीजी, सीटी स्कॅनसारख्या आवश्यक चाचण्याही करण्यात आल्या आहेत. याबाबत डॉक्टरांनीही आपले मत मांडले आहे.

ते पुढे म्हणाले, 'त्यांना रुग्णालयात निरीक्षणाखाली राहण्याचा सल्ला देण्यात आला होता, परंतु त्यांना घरीच राहणे पसंत केले. मुख्यमंत्री निरीक्षणाखली राहणार असून डॉक्टरांच्या टीमच्या सल्ल्यानुसार उपचार सुरू राहणार आहेत. उद्या त्यांची पुन्हा तपासणी करण्यात येणार असून त्यानुसार पुढील उपचाराचा निर्णय घेतला जाणार आहे.

Mamata Banerjee Head Injury
Electoral Bonds Data Disclose : अखेर इलेक्टोरल बाँडचा डेटा झाला उघड! BJP नंबर १ तर दोन नंबरला कोण? धक्कादायक खुलासा..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()