तृणमूलचे अभिषेक बॅनर्जी ‘ईडी’ समोर

पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी आज नवी दिल्लीतील ईडी कार्यालयात हजर झाले
Abhishek Banerjee
Abhishek BanerjeeTeam eSakal
Updated on

नवी दिल्ली : आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी आज नवी दिल्लीतील ईडी कार्यालयात हजर झाले. त्यांची चौकशी करण्यात आली. अभिषेक बॅनर्जी यांची पत्नी रुजिरा यांनाही ईडीने नोटीस बजावली असून त्यांना २२ मार्चला मंगळवारी दिल्लीत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. ईडीच्या चौकशीदरम्यान अभिषेक बॅनर्जी यांनी आपल्यावरचे सर्व आरोप फेटाळून लावले. भाजपच्या इशाऱ्यानुसार कारवाई होत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

कोलकताहून दिल्लीकडे रवाना होण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले की, जनतेच्या शक्तीपुढे आपण शंभरवेळेस झुकण्यास तयार आहोत, परंतु सत्तेत असलेल्या लोकांसमोर कधीही वाकणार नाही. तृणमूल कॉंग्रेसला कोंडीत पकडण्यासाठी आणि पक्षाची शक्ती कमी करण्यासाठी भाजप डावपेच करत आहे. भाजपचा डाव आपण हाणून पाडू, असेही बॅनर्जी म्हणाले. अभिषेक बॅनर्जी यांच्याविरोधात ईडीने सीबीआयच्या २०२० च्या तक्रारीच्या आधारे आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल केला. अभिषेक यांच्या विरोधात आसनसोल, कुनुस्तोरिया आणि कजोरा येथे ईस्टर्न कोल्डफील्डस लिमिटेडच्या खाणतून कोळसा उत्खननात कोट्यवधींचा गैरव्यवहार केल्याचा ठपका आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.