"मोदी देव आहेत तर त्यांचं मंदिर बांधू अन् प्रसाद म्हणून ढोकळा चढवू"; ममता बॅनर्जींची टोलेबाजी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना देव म्हणणाऱ्या संबित पात्रांवर ममतांनी जोरदार हल्ला चढवला आहे.
Mamata Banerjee News
Mamata Banerjee Newsesakal
Updated on

कोलकाता : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना देव असं संबोधणाऱ्या भाजप नेत्यांवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जोरदार हल्लाबोल चढवला आहे. जर मोदी देव असतील तर मी त्यांच्यासाठी मंदिर बांधेन, त्यांच्यावर फूल आणि प्रसाद चढवेन तसंच ढोकळा देखील ठेवेल, अशा शब्दांत ममतांनी निशाणा साधला आहे. (Mamata Banerjee on PM Modi sent by God remark we will build your temple offer dhokla)

Mamata Banerjee News
Arvind Kejriwal : ''तब्येत खराब आहे तर प्रचार का करता?'', भर कोर्टात ED ने केजरीवालांना केला सवाल, म्हणाले...

ममता बॅनर्जी म्हणाल्या, एक जण म्हणतो मोदी देवांचे देव आहेत. एक नेता म्हणतो भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त आहेत. जर खरंच मोदी देव असतील तर मग त्यांनी राजकारण करता कामा नये. देवानं दंगली घडवला नकोत. आम्ही त्यांच्यासाठी मंदिर बांधू त्यांची पुजाही करु. त्यांना प्रसाद आणि फूल अर्पण करु तसंच हवंतर ढोकला पण चढवू.

Mamata Banerjee News
T20 World Cup 2024 : आयसीसीनं स्पर्धेतील प्रमुख संघाची जर्सी केली बॅन! टी20 वर्ल्डकपला वादाची किनार?

ममता पुढे म्हणाल्या, मी मोदींना खुलं आव्हान देते की मोदी सध्या मुलाखती देताहेत. स्वतःच प्रश्न तयार करत आहेत आणि स्वतः उत्तरं देत आहेत. तसंच त्याच्या बाजूला स्वतःचाच फोटो लावत आहेत. त्यामुळं मी त्यांना सार्वजनिकरित्या त्यांना आव्हान देते. मला सांगा आपण कुठे चर्चा करायची. गुजरातमध्ये? मी गुजरातलाही जाईन. यावेळी मीडिया दोघांनाही स्वतंत्रपणे प्रश्न विचारेल.

मी पण बघते की मोदींकडं किती ज्ञान आहे. कारण त्यांनी दावा केला होता की मी खाणार नाही आणि खाऊ देणार नाही. आता त्यांना विचारायला हवं की त्यांचा पक्ष हा सर्वाधिक भ्रष्ट आहे आणि त्यांनी देश सुद्धा विकायला काढला आहे. आम्हाला मोदींना हटवायचं आहे आणि देशात शांतता प्रस्थापित करायची आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.