Kolkata News: आर.जी. कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील एका महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणाने पश्चिम बंगालच्या जनतेत प्रचंड असंतोष धगधगत आहे.
या असंतोषामुळे सत्ताधारी तृणमूल काँग्रेससाठी मोठे राजकीय संकट निर्माण झाले. २०११ मध्ये मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांना प्रथमच तेरा वर्षाच्या कालखंडात गंभीर राजकीय आव्हांनाना सामोरे जावे लागत आहे. दुसरीकडे या तृणमूलमध्ये अंतर्गत नाराजी असून जनता मात्र भाजप आणि माकपशिवाय तिसऱ्या राजकीय गरजांच्या शोधात आहे.