Mamata Banerjee: येचुरींनंतर ममता बॅनर्जीही जाणार नाहीत राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला?; 'हे' आहे कारण

अयोध्येत राम लल्लाच्या प्रतिष्ठापनेची सध्या जय्यत तयारी सुरु आहे.
Mamata Banerjee
Mamata Banerjee
Updated on

कोलकाता : अयोध्येत राम लल्लाच्या प्रतिष्ठापनेची सध्या जय्यत तयारी सुरु आहे. यासाठी राम मंदिर ट्रस्टनं देशभरातील सर्व मुख्यमंत्र्यांना, बड्या राजकारण्यांना तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रण धाडली आहेत.

पण यामध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांचा पक्ष अर्थात तृणमुल काँग्रेस या सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत. सुत्रांच्या हवाल्यानं इंडिया टुडेनं याबाबत वृत्त दिलं आहे. (Mamata Banerjee will not attend inauguration of Ram temple Source information)

Mamata Banerjee
Advisory: दिल्लीत दुतावासाबाहेर स्फोटानंतर इस्राइली नागरिकांसाठी अ‍ॅडव्हायझरी जाहीर; जाणून घ्या डिटेल्स

तृणमुल काँग्रेसनं याबाबत अधिकृतरित्या कुठलीही घोषणा केलेली नाही. पण ममता बॅनर्जींचे जवळच्या सुत्रांनी सांगितलं की, राम मंदिराचं उद्घाटन हा सत्ताधारी भाजपचं राजकीय नरेटिव्ह आहे. त्यामुळं त्यांच्या या नरेटिव्हला तृणमूल काँग्रेस भाग होणार नाही. आगामी २०२४ च्या लोकसभेच्या प्रचारासाठी भाजपकडून राम मंदिराचा वापर केला जाणार आहे. त्यामुळं तृणमूलचा याला पाठिंबा नाही. (Marathi Tajya Batmya)

Mamata Banerjee
Bharat Nyay Yatra: आता 'भारत न्याय यात्रा'! मणिपूर ते मुंबई सुरु होणार राहुल गांधींचा झंझावात; 'या' राज्यांमधून करणार प्रवास

राम मंदिर ट्रस्टनं देशातील सर्व मुख्यमंत्र्यांना या राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी निमंत्रणं पाठवल्याच्या पार्श्वभूमीवर ही नवी माहिती समोर आली आहे. याआधी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी राम मंदिराच्या उद्घाटन समारंभाचं निमंत्रण नाकारलं,

"धर्म ही वैयक्तिक बाब आहे. त्यामुळं त्याचा राजकीय हत्यार म्हणून वापर करु नका असं त्यांनी म्हटलं होतं" ट्विटरवर येचुरी यांनी भाजप आणि आरएसएसवर सडकून टीका करताना यांच्याकडून धार्मिक सोहळ्याला सरकार पुरस्कृत इव्हेंट केलं जात असल्याचा आरोपही केला होता. (Latest Marathi News)

Mamata Banerjee
MIM Vs Congress: "काँग्रेसपेक्षा एमआयएम पक्ष मोठा"; जलिल यांच्या दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया, म्हणाले, दहा वर्षांपासून...

बांधकाम सुरु असलेल्या राम मंदिराच्या उद्घाटनाची तारीख २२ जानेवारी रोजी ठरली असून या भव्यदिव्य सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि इतर ६,००० निमंत्रित या सोहळ्याला हजेरी लावतील असं सांगितलं जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()