'लढण्याची हीच वेळ!' विरोधी पक्ष प्रमुखांना आणि मुख्यमंत्र्यांना ममतांचं पत्र

west bengal cm mamata banerjee
west bengal cm mamata banerjee
Updated on

नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी भाजप पक्षाला नेहमीच आपल्या शिंगावर घेताना दिसतात. भाजपला सडेतोड उत्तरे देताना त्या जराही कसर सोडत नाहीत. आजवर नेहमीच त्यांनी भाजपला त्याची जागा दाखवून दिली आहे. पश्चिम बंगालमध्ये मोठा विजय प्राप्त करुन त्यांनी हेच सिद्ध करुन दाखवलंय. केंद्रीय सत्तेलाही त्या वारंवार आपल्या टीकेच्या केंद्रस्थानी ठेवतात. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जी याच पंतप्रधान मोदींना आव्हान देऊ शकतील, अशी शक्यता म्हणूनच राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केली जाते. आता या साऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजप पक्षावर टीका करत विरोधकांना एकजूट व्हायचं आवाहन ममतांनी केलं आहे.

west bengal cm mamata banerjee
'हिंदूंच्या सणांना परवानगी देताना हाताला लकवा का भरतो'
west bengal cm mamata banerjee
'हिंदूंच्या सणांना परवानगी देताना हाताला लकवा का भरतो'

ममता बॅनर्जींनी देशातील प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांना आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहलंय. त्यांनी या पत्रामध्ये भाजपच्या लोकशाहीवरील थेट हल्ल्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. भाजपविरोधात लढण्याची हीच वेळ असल्याचंही त्यांनी कटाक्षाने सांगितलं आहे. या पत्रात त्यांनी म्हटलंय की, प्रत्येकाच्या सोयीनुसार आणि योग्यतेनुसार एखाद्या ठिकाणी पुढील वाटचालीसाठी विचारमंथन करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यावे अशी मी विनंती करते, असं त्यांनी आवाहन केलं आहे. (Mamata Banerjee)

west bengal cm mamata banerjee
'भाजपच्या कट्टर समर्थकांनी मतदानाला बाहेर पडू नये, नाहीतर..'

तृणमूल काँग्रेस पक्षाच्या ट्विटरवर हे पत्र पोस्ट करण्यात आलंय. या पत्रात त्यांनी भाजप पक्षाच्या एकाधिकारशाहीवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी म्हटलंय की, भाजपने आपल्या देशाच्या संघ रचनेवर वारंवार हल्ला केला आहे. त्यामुळे आता या जुलमी राजवटीचा एकजुटीने सामना करण्याची वेळ आली आहे, असं त्यांनी ठामपणे म्हटलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.