कोलकता - ‘रस्त्यावरची लढाई लढण्याबरोबरच लोकांचे नेतृत्व करण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. आपण सगळे मिळून २०२४ मध्ये भाजपचा सफाया करू शकतो. मी सर्व राजकीय पक्षांच्या संपर्कात आहे पण, सध्या मात्र कोरोनाशी दोन हात करण्यावर माझा भर आहे,’’ असे तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांनी आज स्पष्ट केले.
बंगालमध्ये (West Bengal) सत्तास्थापनेला वेग आला असून ममतांची आज तृणमूलच्या विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली. आता त्या पाच मे रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. दरम्यान शपथविधीच्या दिवशी देशभर आंदोलन करण्याचा निर्णय भाजपने (BJP) जाहीर केला आहे.
ममतांनी आज सायंकाळीच राज्यपालांची भेट घेत त्यांच्याशी सत्तास्थापनेच्या अनुषंगाने चर्चा केली. नंदीग्राममधील मतांच्या कथित हेराफेरीवरून देखील त्यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला. नंदीग्राममधील निवडणूक अधिकाऱ्याला जीवाचा धोका असल्यानेच त्याने फेरमतमोजणी घेण्याचे आदेश दिले नाहीत, असेही ममता यांनी स्पष्ट केले. येथे झालेल्या अटीतटीच्या लढतीमध्ये भाजपच्या सुवेंदू अधिकारी (Suvendu Adhikari) यांनी ममतांचा १९५६ मतांनी पराभव केला होता.
अचानक चित्र बदलले
आमच्या जिवाला धोका असल्यानेच आम्ही फेर मतमोजणी घेण्याचे आदेश देऊ शकलो नाही, असे निवडणूक आयोगाच्या काही अधिकाऱ्यांनीच मला सांगितल्याचे ममता म्हणाल्या. निवडणूक आयोगाचे सर्व्हर चार तास बंद होते, याच काळामध्ये राज्यपालांनी विजयाबद्दल माझे अभिनंदन देखील केले पण नंतर मात्र काही क्षणांत चित्र बदलल्याचे ममतांनी नमूद केले.
ममता म्हणाल्या...
जनतेने शांत राहावे, केंद्रीय दलांकडून छळ
आता आमचा संघर्ष कोरोनाच्या विरोधात
केंद्राने लसीकरणासाठी ३० हजार कोटी द्यावेत
केवळ दोन ते तीन राज्यांनाच केंद्राची मदत
राज्यातील हिंसाचारास भाजपचीच चिथावणी
निवडणूक पुढे ढकलली
नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये २९४ पैकी २९२ जागांवर निवडणूक झाली. उर्वरित जांगीपूर आणि समशेरगंज या दोन मतदारसंघातील उमेदवारांचे निधन झाल्याने निवडणूक १६ मे रोजी होणार होती. ओडिशातही पिपली मतदारसंघात याच दिवशी पोटनिवडणूक होणार होती. मात्र, सध्याची कोरोना संसर्गाची स्थिती आणि राज्यांनी लागू केलेले निर्बंध पाहता या तिन्ही ठिकाणी जाहीर झालेली निवडणूक पुढे ढकण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. नवीन अधिसूचना नंतर जारी केली जाणार आहे.
शपथविधी वेळी भाजपचे आंदोलन
नवी दिल्ली - पश्चिम बंगालमधील पराभवाने हादरलेल्या भाजपने ममता बॅनर्जी यांच्या शपथविधीच्या दिवशी देशव्यापी धरणे आंदोलनाची घोषणा केली आहे. पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांना उद्याच बंगालमध्ये जाण्यास सांगण्यात आले आहे.
दुसरीकडे भाजपचे प्रभारी कैलास विजयवर्गीय यांनी आपल्या मूळ गावी, इंदूरमध्ये परत जावे, त्यांचे येथे काही काम नाही असा हल्लाबोल तृणमूल काँग्रेसचे नेते, खासदार सौगत रॉय यांनी केला आहे.
विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचा विजय झाल्यावर त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून भाजपची कार्यालये जाळली जात आहेत, भाजप कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ले होत आहेत, महिला कार्यकर्त्यांवर बलात्कार होत आहेत, असा आरोप भाजपकडून केला जात आहे. तृणमूल काँग्रेसने हे सारे आरोप फेटाळताना भाजपला बंगाली जनतेने मुळापासून नाकारले आहे असा दावा केला आहे.
अन्य राज्यांत
तमिळनाडूत ७ मे रोजी स्टॅलिन यांचा शपथविधी
आसामात मुख्यमंत्रिपदाचा सस्पेन्स मात्र कायम
केरळमध्ये पुढील आठवड्यात पी. विजयन यांचा शपथविधी
पुदुच्चेरीमध्ये रंगास्वामी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.