धक्कादायक! पत्नी हॉस्पिटलमध्ये.. बिल भरायला पैसे नव्हते; व्यक्तीला चिमुकल्या बाळाला विकायला लावले

Uttar Pradesh man forced to sell 3-year-old son: वडिलाकडे हॉस्पिटलचे बिल भरण्यासाठी पैसे नव्हते, त्यामुळे नाईलाजाने त्याला आपल्या मुलाला विकावे लागले आहे.
son Mother
son Mother
Updated on

Man allegedly compelled to sell son

लखनऊ- उत्तर प्रदेशच्या कुशीनगरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आपली पत्नी आणि नवजात बाळाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळवण्यासाठी आपल्या तीन वर्षाच्या मुलाला विकण्याला भाग पाडण्यात आले आहे. वडिलाकडे हॉस्पिटलचे बिल भरण्यासाठी पैसे नव्हते, त्यामुळे नाईलाजाने त्याला आपल्या मुलाला विकावे लागले आहे.

सदर घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी कठोर कारवाई केली असून आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे. यात मुलाला विकत घेणाऱ्या दाम्पत्याचा देखील समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हरिश पटेल हे बर्वा पट्ट्टीचे रहिवासी आहेत. हरिश यांच्या पत्नीची डिलिव्हरी होणारी होती. त्यामुळे तिला खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

son Mother
Pune Ganesh Festival Parking : पुण्यात गणपती पाहायला जाताय? आता पार्किंगची चिंता नाही; 'या' २७ ठिकाणी केलीय सोय
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.