हैदराबाद : पत्नीने मटणची भाजी बनवून दिली नाही म्हणून पोलिसांना फोन करणे एका व्यक्तीला चांगले महागात पडले. त्याने पत्नीची तक्रार नोंदविण्यासाठी तब्बल सहा वेळा पोलिसांना फोन केला. पण, पत्नीऐवजी त्याची कोठडीत रवानगी झाली. तेलंगणातील नालगोंडा (Nalgonda Telangana) जिल्ह्यातील कनागल येथे ही घटना घडली.
आरोपी ओ. नवीन (२८) हा तेलंगणातील कनागल येथील मजूर आहे. नवीनने शुक्रवारी रात्री मद्यपान केले आणि मटण घेऊन घरी गेला. त्याने पत्नीला मटणची भाजी बनवायला सांगितली. पण, पती दारू प्यायला होता त्यामुळे तिनं भाजी बनवायला नकार दिला. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. हा वाद इतक्यावरच थांबला नाहीतर नवीनने पत्नीची पोलिसांत तक्रार नोंदविण्यासाठी १०० नंबरवर फोन केला. त्याची सर्व समस्या ऐकून घेतल्यानंतर हा बनावट फोन असावा असं समजून पोलिसांनी फोन कापला. पण, नवीनने तब्बल सहा वेळा पोलिसांना फोन करून एकच तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी लगेच त्याचे घर गाठले. पण, तो झोपला होता. त्यामुळे त्याला अटक न करता पोलिस परतले.
कायदेशीर कामात अडथळा आणल्याप्रकरणी नवीनविरोधात रात्रीच गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी सकाळीच नवीनचे घर गाठले आणि त्याला अटक केली. पण, मी दारूच्या नशेत तक्रार केल्याची कबुली त्याने दिली, असं पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.