उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये पती-पत्नीचं एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. येथे एका विवाहित व्यक्तीने विवाहबाह्य संबंधातून असे कृत्य केले की, त्याला तुरुंगात जावे लागले. त्या माणसाच्या प्रेयसीने त्याला तुरुंगात पाठवले आहे. विवाहित असूनही प्रियकराने आपली फसवणूक केल्याचा आरोप तिने केला आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.