कोरोना काळात अनेकांनी आपल्या जवळच्या लोकांना गमावला. मात्र मध्यप्रदेशमधील धार जिल्ह्यात एक विचीत्र प्रकार समोर आला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 40 वर्षीय व्यक्तीला बडोदा येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यानंतर तेथेच त्याच्यावर अंत्यसंस्कार देखील करण्यात आले. मात्र बरोबर दोन वर्षांनंतर अचानक हा मृत व्यक्ती जीवंत घरी परतला आणि कुटुंबीयांता आनंद गगनात मावेना.
मात्र, यादरम्यान या व्यक्तीला एका टोळीने ओलीस ठेवून अत्याचार केल्याची चर्चा आहे. हा व्यक्ती संधी मिळताच त्याने बदमाशांच्या तावडीतून सुटका करून घेत शुक्रवारी रात्री सरदारपूर तहसीलमधील आपल्या मामाचे घर गाठले आणि त्यानंतर पोलिसांना याबद्दल माहिती देण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, कमलेश या व्यक्तीला २०२१ मध्ये कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना बडोदा येथील खासगी रुग्णालयात कोरोना उपचारासाठी नेण्यात आले. येथे उपचारादरम्यान डॉक्टरांनी कमलेशला मृत घोषित केले होते.
रुग्णालयाची माहिती मिळताच नातेवाईक पोहोचले. मात्र कोरोना पॉझिटिव्ह असल्याने मृतदेह दुरूनच कुटुंबीयांना दाखवण्यात आला. पॉलिथिनमध्ये गुंडाळलेल्या मृतदेहाची खात्रीशीर ओळख पटवणे शक्य नव्हते. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याने कुटुंबीयांनी त्याला कमलेश म्हणून स्वीकारले. कोरोना संक्रमीत असल्याने कोविड टीमने बडोदा येथेच त्याच्यावर अंतिम संस्कार देखील केले.
रुग्णालयाच्या रेकॉर्डनुसार मृत्यु झाल्याचं समूजन समजून शोकसभा देखील करण्यात आली. कुटुंबाला यामुळे मोठा धक्का सहन करावा लागला. तसचे मृत्यु झाला असे समजून सदर व्यक्तीची पत्नीही दोन वर्षांपासून विधवेचे जीवन जगत होती. पण कमलेशच्या जिवंत असल्याची बातमी कळताच कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू फुललं.
नेमकं काय झालं?
कमलेशने सांगितले की कोरोनातून बरे झाल्यावर तो एका टोळीच्या तावडीत सापडल्याची माहिती दिली. त्याने सांगितले की अहमदाबादमध्ये पाच ते सात तरुणांनी त्याला ओलिस ठेवले होते आणि एक दिवस आड त्याला ड्रग्सचे इंजेक्शन दिले होते. ज्यामुळे तो सर्व वेळ बेशुद्ध होता. शुक्रवारी त्यांलाअहमदाबादहून चारचाकी वाहनातून दुसऱ्या ठिकाणी नेले जात होते. दरम्यान, टोळीचे सदस्य एका हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी थांबले. दरम्यान, अहमदाबादहून इंदूरकडे प्रवासी बस येत असल्याचे पाहून तो चारचाकीतून खाली उतरून बसमध्ये बसला.
रात्री उशिरा सरदारपूर येथे उतरून तेथे उपस्थित लोकांना बडवेली येथे त्याच्या मामाच्या घरी पोहोचण्यास सांगितले. त्यानंतर लोकांच्या मदतीने तो बारवेलीला पोहोचल्याचे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.