Worm In Dairy Milk: कॅडबरी डेअरी मिल्कमध्ये चक्क जिवंत अळी? सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल, कंपनीने दिलं उत्तर

Worm In Dairy Milk: जगात खूप कमी लोक असतात ज्यांना चॉकलेट आवडत नसेल. काही लोक तर चॉकलेटचे वेडे असतात. यात फक्त लहान मुलांनाच चॉकलेट आवडत असं नाही तर ते मोठ्यांनाही तेवढच आवडतं, पण त्यात अळी दिसली तर?
Worm In Dairy Milk
Worm In Dairy MilkEsakal
Updated on

जगात खूप कमी लोक असतात ज्यांना चॉकलेट आवडत नसेल. काही लोक तर चॉकलेटचे वेडे असतात. यात फक्त लहान मुलांनाच चॉकलेट आवडत असं नाही तर ते मोठ्यांनाही तेवढच आवडत. आपण कुणालाही एक चॉकलेट देऊन खुश करू शकतो. मात्र, कॅडबरीच्या क्षेत्रात मोठं नाव असलेल्या एका डेअरी मिल्कच्या एका कॅडबरीमध्ये अळी सापडल्याचा दावा एका ग्राहकाने केला आहे. या अळीचा व्हिडीओ त्या व्यक्तीने सोशल मिडीया एक्सवरती शेअर केला आहे. या पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली असून डेअरी मिल्कच्या एका कॅडबरीच्या गुणवत्तेवर काही युजर्स प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.(Latest Marathi News)

सोशल मिडीया एक्सवर ही पोस्ट रॉबिन झॅकियस नावाच्या व्यक्तीने शेअर केली आहे. ही घटना हैदराबादच्या अमीरपेटमधील रत्नदीप मेट्रोमध्ये घडल्याचा दावा या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. “अमीनपेटमधील रत्नदीप मेट्रोमधून मी खरेदी केलेल्या कॅडबरी चॉकलेटमध्ये एक जिवंत अळी सापडली आहे. या अशा एक्स्पायरी डेट नजीक आलेल्या उत्पादनांची तपासणी करण्यासाठी कोणती यंत्रणा आहे का? आरोग्याच्या बाबतीतल्या या अक्षम्य हलगर्जीपणासाठी कोण जबाबदार आहे?" असा प्रश्न रॉबिन यांनी उपस्थित केला आहे.

Worm In Dairy Milk
भाजपला इलेक्टोरल बॉन्ड्समधून मिळाले काँग्रेसहून सातपट जास्त पैसे; तिजोरीत पडली 'इतक्या' कोटींची भर

व्हिडीओमध्ये काय आहे?

रॉबिन झॅकियस या व्यक्तिने आपल्या पोस्टसोबत एक व्हिडीओही शेअर केला असून त्यात डेअरी मिल्क कॅडबरीच्या अर्धवट फाडलेला वरील रॅपर थोडा बाजुला केलेला दिसत आहे. तर कॅडबरीवर वळवळणारी जिवंत अळी दिसत आहे. या व्हिडीओसोबत खरेदीचं बिलही देण्यात आलं असून त्यात ९ फेब्रुवारी रोजी ही कॅडबरी रत्नदीप रिटेल शॉपमधून ४५ रुपयांना खरेदी केल्याचं दिसत आहे. (Marathi Tajya Batmya)

Worm In Dairy Milk
Haldwani Violence: हल्दवानी हिंसाचाराचा सूत्रधार कोण? ज्याच्या बागेत मशीद होती त्या व्यक्तीचा शोध सुरू

रॉबिनने केलेल्या पोस्टवर कॅडबरी डेअरी मिल्कनं दिलं उत्तर

रॉबिनने केलेल्या पोस्टवर कॅडबरी डेअरी मिल्कने उत्तर दिलं आहे. उत्तर देताना त्यांनी म्हटलं आहे की, "नमस्कार. मंडेलेज इंडिया फूड प्रायव्हेट लिमिटेड (आधीचं कॅडबरी इंडिया लिमिटेड) कायमच उत्पादनांचा उच्च दर्जा राखण्यासाठी प्रयत्नशील आहे. तुम्हाला आलेल्या वाईट अनुभवासाठी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. तुमच्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी कृपया तुमची तक्रार suggestions@mdlzindia.com वर पाठवा. त्यासोबत तुमचं संपूर्ण नाव, पत्ता, फोन नंबर आणि खरेदीची केलेली माहिती द्या", असं कंपनीकडून संबंधित ग्राहकाला उत्तर देण्यात आलं आहे.

Worm In Dairy Milk
Kalasa-Banduri Scheme : तब्बल 26.96 हेक्टर वनजमीन हस्तांतराचा प्रस्ताव फेटाळला; कर्नाटकाला मोठा दणका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.