Bahraich News: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांचे कौतुक करणे महिलेला महागात पडलं आहे. पतीने पत्नीच्या अंगावर गरम डाळ फेकत तिला तीन तलाक दिला आहे. याप्रकरणी पती आणि कुटुंबातील सात जणांना अटक करण्यात आली आहे. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
पंतप्रधान मोदी आणि योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येमध्ये केलेल्या कामाचं महिलेने कौतुक केलं होतं. त्यामुळे पतीला राग अनावर झाला होता. त्याने पत्नीला बेदम मारहाण केली अन् गरम डाळ तिच्यावर फेकली. महिलेने पोलीस तक्रारीमध्ये यासंदर्भातील माहिती दिली आहे. सदर महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे.