मुलगा-नातवंडांना जीवंत जाळलं; मिठी मारलेल्या स्थितीत आढळले मृतदेह

man sets son two grandkids on fire in their sleep over property dispute says police
man sets son two grandkids on fire in their sleep over property dispute says police Sakal media
Updated on

पैशासाठी माणून कोणत्याही थराला जातो हे आपण बऱ्याचदा पाहतो, असाच एक भयंकर प्रकार समोर आलाय. एका वृद्ध व्यक्तीने क्रूरतेचा कळस गाठत संपत्तीच्या वादातून आपल्या मुलासह कुटुंबातील इतर तीन सदस्यांना जीवंत जाळल्याचा भयंकर घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या वृध्द व्यक्तीने आपल्याच घराला आग लावून मुलगा व नातवंडांना ठार मारले. केरळ येथील इड्डुकी येथे ही घटना आज पहाटेच्या सुमारास घडली, अशी माहिती पोलिसांनी दिली. घरामध्ये झोपलेल्या आरोपीचा मुलगा, सून आणि दोन शाळेत जाणाऱ्या नातवंडांचा जाळून मृत्यू झाला, असे पोलिसांनी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया या वृत्तसंस्थेला सांगितले.

७९ वर्षीय हमीदने घराला बाहेरून कुलूप लावून खिडकीतून आतमध्ये पेट्रोलने भरलेल्या छोट्या बाटल्या फेकल्या. त्यानंतर त्यांनी घराला आग लावली. या भयंकर प्रकारानंतर त्याला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. आग लागल्याचे लक्षात येताच कुटुंबातील एका सदस्याला जाग आली आणि त्यांनी मदतीसाठी हाक मारली, पण संपुर्ण घर आगीने वेढल्याने शेजाऱ्यांना त्यांना वाचवता आले नाही.

man sets son two grandkids on fire in their sleep over property dispute says police
TVS चे आणखी एक स्वस्त स्कूटर लॉंच; जाणून घ्या किंमतीसह सर्वकाही

पोलिसांनी सांगितले की, हमीदला पेट्रोलने भरलेली बाटली घरात फेकताना पाहिल्याचे एका शेजाऱ्याने सांगितले. "हा सुनियोजित खून होता कारण हमीदने गुन्हा करण्यासाठी किमान पाच बाटल्यांमध्ये पेट्रोलचा साठा केला होता आणि आग विझवता येऊ नये म्हणून घरातील पाण्याची टाकीही रिकामी केली होती. शेजाऱ्यांनी आग विझवता येऊ नये म्हणून त्याने विहिरीतून पाणी आणण्यापासून रोखण्यासाठी त्याने बादली आणि दोरीही काढली होती ," एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाला सांगितले.

आग आटोक्यात आल्यानंतर त्या घरातील दृश्य हे हृदय पिळवटून टाकणारे होते, कारण वडील आणि सर्वात लहान मुलगी यांचे जळालेले मृतदेह एकमेकांना घट्ट मिठी मारलेल्या स्थितीत आढळले, असे पोलिसांनी सांगितले.

man sets son two grandkids on fire in their sleep over property dispute says police
देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार महागली; जाणून घ्या नवीन किंमत

"पुढील तपास प्रक्रियेसाठी मृतदेह वेगळे करणे आमच्यासाठी खूप अवघड होते," असे पोलिसांनी यावेळी सांगितले. चौकशीदरम्यान आपण आपल्या मुलासह कौटुंबिक मालमत्तेवरून हा भीषण गुन्हा केल्याचे हमीदने मान्य केले.

man sets son two grandkids on fire in their sleep over property dispute says police
50MP कॅमेरासह iQoo Z6 5G स्मार्टफोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()