देशाची राजधानीतील दक्षिण दिल्लीच्या ग्रेटर कैलाश भागात गुरूवारी रात्री गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत जिमच्या बाहेर उभ्या संचालकावर गोळीबार करण्यात आला. मृत व्यक्तीचे नाव नादिर शाह असे सांगितले जात आहे. त्याला ३ ते ४ गोळ्या लागल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले, जेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. दरम्यान रात्री झालेल्या या घटनेचा सीसीटिव्ही व्हिडीओ देखील समोर आला आहे.
दरम्यान या हत्याकांडात एक वेगळाच ट्विस्ट समोर आला असून या हत्येची जबाबदारी गँगस्टर रोहित गोदारा यांनी घेतली असल्याने हा प्रकार गँगवॉरमधून झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.