27 कोटींचं एक घड्याळ! दिल्ली विमानतळावर कस्टमची जप्तीची मोठी कारवाई

Crime News
Crime News
Updated on

नवी दिल्ली - दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (IGI विमानतळ) विमानतळ सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी एका भारतीय प्रवाशाविरुद्ध 7 अत्यंत मौल्यवान घड्याळांची तस्करी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. प्रवाशाकडून अधिकाऱ्यांनी 7 रोलेक्स घड्याळे, एक हिरे जडीत सोन्याचे ब्रेसलेट आणि आयफोन 14 प्रो जप्त केले आहे. (Crime news in Marathi)

Crime News
एकनाथांना हवेत आणखी दोन 'नाथ'? भाषणात 'एवढ्या'वेळा केला मोदी-शहांचा उल्लेख

जप्त करण्यात आलेले एक घड्याळ सोन्याचे असून ते हिरे जडीत आहे. त्याची किंमत २७ कोटी, ९ लाख, २६ हजार, ५१ रुपये आहे. त्याचबरोबर एकूण जप्त केलेल्या मालाची किंमत २८ कोटी १७ लाख ९७ हजार ८६४ रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी भारतीय दुबईहून फ्लाइट क्रमांक EK 516 ने दिल्ली विमानतळावर पोहोचला होता. एपीआयएस प्रोफाइलिंगच्या आधारे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

Crime News
Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रेत राहुल गांधी बनले आधुनिक श्रावणबाळ

जप्त केलेल्या वस्तू सीमाशुल्क कायदा, 1962 च्या कलम 110 अंतर्गत जप्त करण्यात आल्या आहेत. प्रवाशाला सीमा शुल्क कायदा, 1962 च्या कलम 104 अंतर्गत अटक करण्यात आली आहे, कारण त्याने केलेला गुन्हा कलम 135 अंतर्गत अजामीनपात्र गुन्हा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.