पुतण्याने NEET च्या अभ्यासात व्यत्यय आणल्याने वहिनीचा भोसकून खून

man stabs sister in law to death after nephew disrupts his studies for neet
man stabs sister in law to death after nephew disrupts his studies for neet Sakal
Updated on

भोपाळ : मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये एका 22 वर्षीय तरुणाने दोन वर्षांचा पुतण्या NEET च्या आभ्यासात व्यत्यय आणत असल्यावरून आपल्या वहिनीचा कथितरित्या भोसकून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे, चिमुकल्या पुतण्याच्या सततच्या रडण्यामुळे त्याच्या आभ्यासात व्यत्यय येत असल्याच्या रागतून त्याने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. असे पोलिसांनी मंगळवारी सांगितले.

पीडीत महिली कविता अहिरवार (२५) यांचा दीर मनोज अहिरवार याने सोमवारी त्यांच्या घरी चाकूने वार केल्याची माहिती गांधी नगर पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक अरुण कुमार शर्मा यांनी दिली.

मनोज हा NEET (नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट) ची तयारी करत होता आणि त्याचा दोन वर्षांचा पुतण्या सतत रडत होता, या दरम्यान आरोपीने पीडितेला मुल रडणार नाही याची काळजी घेण्यास सांगितले, परंतु तिने त्याला दुर्लक्ष केलं, असं अधिकाऱ्याने सांगितले. त्यानंतर पीडितेच्या प्रतिक्रियेमुळे संतप्त झालेल्या आरोपीने स्वयंपाकघरातून चाकू घेतला आणि तिच्यावर निर्घृण वार करून तिची जागीच हत्या केली, असे त्यांने पोलिसांना सांगितले.

man stabs sister in law to death after nephew disrupts his studies for neet
गुड न्यूज! अखेर ट्विटरला 'एडीट बटण' मिळणार, काय असेल खास? वाचा

आरोपी आणि पीडितेमध्ये या प्रकरणावर यापूर्वीही वाद झाला होता, त्याने सांगितले की, हल्ल्याच्या वेळी कुटुंबातील इतर सदस्य त्यांच्या दैनंदिन कामात व्यस्त होते. त्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती कळवणयात आली, तसेच पीडितेचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.

man stabs sister in law to death after nephew disrupts his studies for neet
''..तर मी नाही म्हणणार नाही"; संघटनांवर बंदीबाबत शरद पवारांचे विधान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.