MonkeyPox : केरळमध्ये लक्षणं असलेल्या व्यक्तीचा मृत्यू, उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

लागण झालेली व्यक्ती 22 जुलै रोजी युएईमधून भारतात दाखल झाली होती.
Monkeypox Update
Monkeypox Update esakal
Updated on

Monkeypox India Update : केरळमध्ये मंकीपॉक्सच्या लक्षण असलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे समोर आले असून, यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेनंतर राज्य सरकारने या घटनेची उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत, असे राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले. लागण झालेली व्यक्ती 22 जुलै रोजी युएईमधून भारतात दाखल झाली होती. मंकीपॉक्स हा जीवघेणा आजार नसून, संबंधित व्यक्तीवर उपचारात झालेल्या दिरंगाईची चौकशी केली जाईल.

जॉर्ज म्हणाल्या की, मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मंकीपॉक्स टेस्टचा अहवाल यूएईमध्ये पॉझिटिव्ह आला होता. ही व्यक्ती 22 जुलै रोजी भारतात आल्यानंतर त्याची मंकीपॉक्सची चाचणी करण्यात आली त्यात त्याचा आहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याला 27 जुलै रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अधिकचा थकवा आणि एन्सेफलायटीसमुळे त्यांच्यावर त्रिशूरमध्ये उपचार सुरू होते. या मृत्यूबाबत आरोग्य विभागाने पुन्नूर येथे बैठकही बोलावण्यात आली असून, मृत व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यकींची संपर्क यादी तयार करण्यात आली आहे. तसेच संपर्कात आलेल्या सर्वांना आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Monkeypox Update
इकडे संजय राऊतांना अटक; तिकडे शरद पवार दिल्लीला रवाना

आत्तापर्यंत भारतात मंकीपॉक्सचे पाच रुग्ण आढळून आले आहेत, त्यापैकी तीन केसेस केरळमधील तर, एक दिल्ली आणि एक आंध्र प्रदेशातील गुंटूरचा आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये दिवसेंदिवस वाढणाऱ्या मंकीपॉक्सच्या रूग्णवाढीनंतर केंद्र सरकारने सावध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर, दुसरीकडे निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के. पॉल यांनी या आजाराला घाबरण्याची गरज नाही, परंतु देश आणि नागरिकांनी जागृत असणे महत्त्वाचे असून, ज्यांना या आजारीची लक्षणं दिसत असतील त्यांनी वेळीच टेस्ट करणे आवश्यक आहे.

Monkeypox Update
संजय राऊतांची कोर्टात हजेरी ते ईडी कोठडी; दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार (WHO) आतापर्यंत या आजाराचे 78 देशांमध्ये 18,000 हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर WHO कडून जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे. तसेच न्यूयॉर्कमध्येदेखील आरोग्य आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. कोरोनानंतर नव्याने आलेल्या मंकीपॉक्स आजारामुळे येथे 1.50 लाखांहून अधिक नागरिकांना संसर्ग होण्याचा धोका आहे. रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रांच्या आकडेवारीनुसार न्यूयॉर्कमध्ये शुक्रवारपर्यंत मंकीपॉक्सची 1,345 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. यात कॅलिफोर्निया 799 रूग्णांसह दुसऱ्या स्थानावर असल्याचे न्यूयॉर्कचे महापौर एरिक अॅडम्स आणि आरोग्य आयुक्त अश्विन वासन यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()