Cyclone Updates : मंदौस वादळ हैदोस घालणार? राज्यात पुढचे आठ दिवस कधीही पाऊस पडणार!

१५ डिसेंबरपर्यंत नागरिकांनी अधिक काळजी घेऊन सतर्क राहण्याची गरज आहे.
Yaas Cyclone
Yaas CycloneSakal
Updated on

राज्यात थंडीची तीव्रता कमी जास्त होत असतानाच आता पावसाचीही शक्यता आहे. मंदौस या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे देशासह राज्यातही पाऊस पडू शकतो. तसंच तापमानात वाढही अपेक्षित आहे.

राज्यात 15 डिसेंबरपर्यंत कधीही पाऊस पडण्याची शक्यता आहे. बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण, काही भागांत हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. ९ ते १५ डिसेंबर या कालावधीत राज्यात पावसाची शक्यता अधिक आहे. मंदौस या चक्रीवादळामुळं दक्षिणेकडील राज्यांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्यानं हा अंदाज वर्तवला आहे.

९ डिसेंबरच्या मध्यरात्री मंदौस हे चक्रीवादळ पुदुच्चेरी आणि श्रीहरीकोटादरम्यान महाबलीपुरमजवळ जमिनीवर प्रवेश करेल. या काळात तमिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि केरळमध्येही अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. महाराष्ट्रातही नाशिक, धुळे भागात पावसाची शक्यता असून रात्रीच्या तापमानात दोन ते चार अंशांची वाढ अपेक्षित आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.