सुलतानपूर हा उत्तर प्रदेशातील एक महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ आहे. प्रदीर्घ काळापासून येथे काँग्रेसची सत्ता होती, पण रायबरेली आणि अमेठीप्रमाणे ही जागा व्हीव्हीआयपी होऊ शकली नाही.
यावेळी भाजपच्या मनेका गांधी आणि काँग्रेसचे संजय सिंह यांच्यात लढत होती. यापूर्वी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या वरुण गांधी यांनी बसपाच्या उमेदवाराचा पराभव करून येथे कमळ फुलवले होते.
मात्र, नुकत्याच झालेल्या मतमोजणीत मनेका गांधी यांना जोरदार धक्का बसला असून त्यांचा तब्बल 37 हजार मतांनी पराभव केला आहे. समाजवादी पक्षाच्या रामभुआल निषाद जायन्ट किलर ठरले आहेत.
सुलतानपूर हा उत्तर प्रदेशातील लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. राज्यात लोकसभेच्या एकूण 80 जागा आहेत. सुलतानपूर लोकसभा मतदारसंघात इसौली, सुलतानपूर, सदर, लंबुआ, कादीपूर यासह 5 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. सुलतानपूर ही सर्वसाधारण जागा आहे. या मतदारसंघात भाजप, बसपा हे प्रमुख पक्ष आहेत.
2022 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत येथे भाजपचा दबदबा राहिला आहे. सुलतानपूर लोकसभा मतदार संघातील 5 पैकी 4 जागांवर भाजपचे आमदार आहे तर एका जागेवर समाजवादी पक्षाचा खासदार आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या मनेका संजय गांधी यांनी 14,526 मतांच्या फरकाने ही जागा जिंकली होती. त्यांना 46.00% मतांसह 459,196 मते मिळाली. त्यांनी बसपच्या चंद्र भद्र सिंह "सोनु" यांचा पराभव केला, ज्यांना 444,670 मते (44.43%) मिळाली.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत फिरोज वरुण गांधी यांनी ही जागा जिंकली होती. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत फिरोज वरुण गांधी यांना 42.51% मतांसह 410,348 मते मिळाली. बसपा उमेदवार पवन पांडे यांना 231,446 मते (23.98%) मिळाली. फिरोज वरुण गांधी यांनी पवन पांडे यांचा 178,902 मतांनी पराभव केला.
लंबुआ येथील डॉ. घनश्याम तिवारी यांच्या हत्येप्रकरणी जिल्ह्यातील ब्राह्मण मतादारांचा एक छोटासा वर्गही संतप्त होता. या घटनेत आरोपींचे भाजप नेत्यांशी असलेले संबंध आणि अधिकाऱ्यांचे सुरुवातीचे दुर्लक्ष यामुळे हे मतदार संतप्त दिसत आहेत.
सुलतानपूर मतदारसंघाच्या जातीय समीकरणांबद्दल बोलायचे झाले तर येथे सुमारे अडीच लाख निषाद मतदार आहेत. कुर्मी जातीचे मतदारही चांगले आहेत. सुलतानपूरमध्ये या दोन्ही जाती भाजपला मतदान करत आहेत. ब्राह्मण मतदार आधीच नाराज होते, आता जातीय उमेदवार आल्याने निषाद आणि कुर्मी मतदारही विखुरले तर मेनका यांच्या अडचणी वाढल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.