नवी दिल्ली : मणिपूरमध्ये सुरु असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आजपासून ब्रॉडबॅण्ड सेवेवरील बंदी अंशतः उठवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. पण यासाठी काही कडक अटीशर्ती घालण्यात आल्या आहेत. या अटींचं पालन न केल्यास संबंधित नागरिकावर कारवाई केली जाणार आहे. (Manipur Violence Broadband ban lifted in Manipur strict conditions have to be followed)
मणिपूरमध्ये जातीय हिंसाचाराला सुरुवात झाल्यापासून ३ मे २०२३ पासून इंटरनेटवर बंदी घातलण्यात आलेली आहे. यानंतर आज ८० दिवसांनंतर इथल्या सरकारनं ब्रॉडबॅण्ड सेवा अटीशर्तींसह सुरु करण्यास परवानगी दिली आहे. पण मोबाईलच्या इंटरनेटवर अद्याप पूर्णपणे बंदी कायम ठेवण्यात आली आहे. (Latest Marathi News)
मणिपूरमध्ये ब्रॉडबॅण्ड सेवा सुरु करण्यात आली आहे पण यासाठी पुढील अटी घालण्यात आल्या आहेत. या अटीचं पालन न केल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.
ब्रॉडबॅण्डच्या वापरासाठी स्टॅटिक आयपी अॅड्रेसचाच वापर करण्यात यावा
वायफाय हॉटस्पॉट वापरता येणार नाही
बंदी असलेल्या किंवा ब्लॉक केलेल्या सोशल मीडिया वेबसाईट्स तसेच व्हीपीएन वापरता येणार नाहीत
दररोज इंटरनेट लॉगिन क्रेडेन्शिअल्स बदलावे लागणार आहेत.
संपूर्ण राज्यात मोबाईल इंटरनेटवर बंदी कायम राहणार आहे. कारण मोबाईलवरुनच सोशल मीडियाद्वारे मोठ्या प्रमाणावर खोटी माहिती आणि अफा पसरवली जाते. अशा अफवांपासून बचावासाठी आणि जनतेच्या सुरक्षेसाठी मोबाईल इंटरनेटवरील बंदी कायम ठेवण्यात आली आहे. (Marathi Tajya Batmya)
मणिपूरमधील चुरंदचंदपूर आणि फेरझॉल इथं २८ एप्रिलपासून इंटरनेटवर बंदी घालण्यात आली. त्यानंतर ३ मे पासून संपूर्ण राज्यभरात इंटरनेटवर बंदी घालण्यात आली. त्यानंतर प्रत्येक पाच दिवसांनंतर ब्रॉडबॅण्ड आणि मोबाईल इंटरनेटवर बंदीचे आदेश निघत गेले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.