Manipur Violence : कुकी आणि मैतेई समुदायात संघर्ष सुरूच; तीन दिवसांत मणिपूरमध्ये पाच ठार

२९ ऑगस्ट रोजी पुन्हा हिंसाचार भडकला. खोरेईतक येथे गोळीबार झाला आणि त्यात ३० वर्षीय स्वयंसेवकाचा मृत्यू
manipur violence
manipur violencesakal
Updated on

इंफाळ : मणिपूरच्या बिष्णूपूर आणि चुराचांदपूर जिल्ह्यात कुकी आणि मैतेई समुदायात संघर्ष सुरूच असून गेल्या ७२ तासांत झालेल्या धुमश्‍चक्रीत पाच जणांचा मृत्यू तर १८ जण जखमी झाले आहेत. बिष्णूपूर जिल्ह्यातील खोरेईतक आणि चुराचांदपूर जिल्ह्यातील चिंगफेई आणि खौशाबंग भागात गोळीबार सुरूच असून नागरिक जखमी होत आहेत.

२९ ऑगस्ट रोजी पुन्हा हिंसाचार भडकला. खोरेईतक येथे गोळीबार झाला आणि त्यात ३० वर्षीय स्वयंसेवकाचा मृत्यू झाला. तसेच बॉम्बहल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचा गुवाहाटीला नेत असताना काल मृत्यू झाला. अन्य जखमी नागरिकाचा आज सकाळी चुराचांदपूर रुग्णालयात मृत्यू झाला. तत्पूर्वी नारेनसेना येथे दोन जण ठार झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.