Manipur Violence : केंद्र सरकार एवढं बेशरमपणे कसकाय वागू शकतं? यशोमती ठाकूर संतापल्या

Narendra Modi and Yashomti Thakur
Narendra Modi and Yashomti Thakur
Updated on

मुंबई : मणिपूरमधील महिलांची विवस्त्र धिंड काढल्याच्या घटनेमुळे देश हादरला आहे. महिलांवर झालेल्या अत्याचाराचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे तिथली कायदा-सुव्यवस्था अक्षरशः उद्ध्वस्त झाल्याचे स्पष्ट झालं आहे. यावरून काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. (Manipur Violence)

Narendra Modi and Yashomti Thakur
Manipur Violence: "पोलिसांनीच आम्हाला जमावाजवळ नेऊन सोडलं"; विवस्त्र करण्यात आलेल्या महिलाचां गंभीर आरोप

यशोमती ठाकूर म्हणाल्या की, मणिपूरमध्ये जे घडलं ते अत्यंत वेदनादायी आहे. मागील 77 दिवसांपासून सर्वकाही लपून ठेवलं गेलं आहे. केंद्र आणि राज्य सरकार बेशरम आहे. हे हैवणांचे राज्य आहे. पंतप्रधान मोदी दोन महिने बोलले नाहीत, ते आज निर्लज्जासारखे बोलले. जेव्हा महिलांवर अत्यावर झाले, तेव्हा महाभारत झालं हे लक्षात ठेवावं. आता सत्ताधाऱ्यांनी खुर्च्या खाली केल्या पाहिजेत, अशी मागणी ठाकूर यांनी केली.

Narendra Modi and Yashomti Thakur
Sharad Pawar : शरद पवारांना धक्का! नागालँडमधील सात आमदारांचाही अजित पवार गटाला पाठिंबा

महिला अत्याचाराचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अशा अनेक घटना इथं घडल्या आहेत, अशी धक्कादायक कबुली मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी दिली आहे. अर्थात मुख्यमंत्र्यांनीच अशी कबुली दिल्यामुळे मणिपूरमध्ये किती भीषण परिस्थिती निर्माण झाली, याचा अंदाज येऊ शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()