Manipur Violence: हिंसाचार थांबायचं नाव घेईना, शाळा उघडल्यावर एका महिलेची गोळी घालून हत्या

Manipur Women Shot dead: पश्चिम इंफाळच्या एका शाळेबाहेर काही अज्ञात इसमांद्वारे एका महिलेवर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात महिलेचा जागीच मृत्यू झाला.
Manipur Violence
Manipur ViolenceEsakal
Updated on

Women Shot dead in Manipur: मणिपूरमध्ये मागिल दोन महिन्यांपासून हिंसाचार सुरु होता. हिसांचाराच्या तब्बल दोन महिन्यांनंतर परिस्थिती पुर्ववत करण्यासाठी काही सेवा सुरु करण्यात आल्या. मणिपूरमधील शाळा दोन महिन्यांनंतर सुरू झाल्या होत्या.

मात्र, शाळा सुरू झाल्याच्या एका दिवसानंतर एका महिलेची गोळी घालून हत्या करण्यात आली . पश्चिम इंफाळच्या एका शाळेबाहेर काही अज्ञात इसमांकडून एका महिलेवर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात महिलेचा जागीच मृत्यू झाला. मृत महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही.

सुत्रांच्या अहवालानुसार, ही घटना शिशू निष्ठा निकेतन शाळेच्या बाहेर घडली. शाळा पुन्हा सुरु झाल्यानंतर या घटनेमुळे परिसरात खळबळ निर्माण झाली.(Latest Marathi News)

पीटीआयच्या अहवालानुसार, राज्यात दोन महिन्यांहून अधिक काळ सुरू असलेल्या वांशिक संघर्षांदरम्यान गोळीबार झाला. घटनेच्या आदल्या दिवशी, सुरक्षा दलांनी कांगपोकपी जिल्ह्यात मापाओ आणि अवांग सेकमाई भागातील दोन सशस्त्र गटांमधील संघर्ष उधळून लावला होता.

Manipur Violence
Ajit Pawar NCP : अजित पवार-जयंत पाटील एकत्र येणार; उद्या होणारी 'ही' बैठक दोन्ही नेत्यांसाठी महत्त्वाची

इंटरनेटवरील बंदी वाढवली

मणिपुरमध्ये संघर्ष थांबण्याची चिन्हे दिसत नाहीयेत. मणिपुर सरकारने बुधवारी (दि.५जुलै) घोषणा केली की राज्यात इंटरनेट सेवेवरील बंदी आणखी ५ दिवस वाढवण्यात आली असून, इंटरनेट सेवा १० जुलै दुपारी ३ पर्यंत बंद राहील.(Latest Marathi News)

हे पाऊल राज्यात कायदा आणि सुवव्यस्था राखण्यासाठी उचलण्यात आले आहे. पूर्वोत्तर राज्यांमध्ये ३ मे पासून काही समुदायांमध्ये वांशिक हिंसाचार वाढल्याने इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. ही बंदी वेळोवेळी वाढवण्यात आली आहे.

Manipur Violence
Sharad Pawar : अजित पवार गटाचा 'गद्दार' असा उल्लेख; शरद पवारांच्या बैठकीपूर्वी दिल्लीत झळकले बॅनर

३ मे या दिवशी मेतेयी समुदायाच्या अनुसुचित जमातीच्या दर्जाच्या मागणी विरोधात 'आदिवासी एकता मोर्चा' आयोजित करण्यात आला होता, ज्यामुळे राज्यात हिंसाचाराला सुरुवात झाली.

या हिंसाचारात आतापर्यंत शंभाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून शेकडो लोक जखमी झाले आहेत, याशिवाय हजारो लोकांनी रिलिफ कॅम्पमध्ये आसरा घेतला आहे.

Manipur Violence
Sharad Pawar: अजित पवारांच्या निर्णयानंतर शरद पवार अ‍ॅक्शन मोडमध्ये; दिल्लीत बोलावली राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.