Manipur Violence : आधी त्यांनी माझ्या पती-मुलाला ठार केलं, नंतर मुलीला...; पीडितेच्या आईने सांगितली आपबीती

Manipur Violence
Manipur Violence
Updated on

इम्फाळ: हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये तीन महिलांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढून एका महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या घटनेने देशाला हादरवून टाकले आहे. या घटनेचा पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सर्वांनीच निषेध केला.

Manipur Violence
४१ 'IAS' अधिकाऱ्यांच्या बदल्या! सोलापूरच्या जिल्हाधिकारीपदी कुमार आशिर्वाद, झेडपीच्या CEO मनिषा आव्हाळे

या घटनेमुळे पीडित महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. पीडितेसोबत पाशवी कृत्य करण्यापूर्वी आरोपींनी पीडितेचे वडील आणि भावाचा तिच्यासमोरच खून केला होता. पीडितेच्या आईने सांगितले की, माझं कुटुंब उद्ध्वस्त झालं असून आम्ही आता कधीच आमच्या गावी परतणार नाही. (Latest Marathi News)

पीडित महिलेच्या आईला मोठा धक्का बसला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांना बोलणंही कठीण झालं होतं. मणिपूर सरकारने हिंसाचार थांबवण्यासाठी आणि लोकांचे संरक्षण करण्यासाठी ठोस पावले उचलली नसल्याचा आरोप त्यांनी केला. (Marathi Tajya Batmya)

Manipur Violence
Video: इर्शाळवाडीत अत्याधुनिक यंत्रणा पोहोचू शकत नाही, श्वान पथकातील 'फिरो'नं केली मोठी मदत

पीडितेच्या आईने सांगितलं की, जमावाने माझे घर जाळले. माझ्या पती आणि मुलाची हत्या केली. त्यानंतर मुलीला विवस्त्र करण्यात आले. तिची रस्त्यावरून धिंड काढली. तसेच लैंगिक हिंसाचार करण्यात आला.

सदर घटना ४ मे रोजीची आहे. घटनेचा व्हिडिओ बुधवारी सोशल मीडियावर समोर आला आणि व्हायरल झाला. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 4 जणांना अटक केली आहे.

पीडितेच्या आईने सांगितले की, "मी सर्वात धाकटा मुलगा गमावला आहे, जो माझी एकमेव आशा होता. मला आशा होती की एकदा त्याने १२ वी पूर्ण केली तो तो काही काम करण्यास सुरवात करेल. खडतर कष्ट करून मी त्याला शिकवले. आता त्याचे वडीलही जीवंत नाहीत. मोठ्या मुलाला नोकरी नाही. आता जगण्याची काही आस राहिली नाही. मी खचून गेले, असंही पीडितेच्या आईने सांगितलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.