Manipur Violence: कोण आहेत निवृत्त सैन्य अधिकारी ज्यांच्या खांद्यावर आहे मणिपूर शांत करण्याची जबाबदारी? जाणून घ्या...

मणिपूरमध्ये गेल्या दोन महिन्याहून अधिक काळ हिंसाचाराने थैमान घातलं आहे. या हिंसाचारामध्ये दोन महिन्यांत जवळपास १७० हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
Manipur Violence: कोण आहेत निवृत्त सैन्य अधिकारी ज्यांच्या खांद्यावर आहे मणिपूर शांत करण्याची जबाबदारी? जाणून घ्या...
Updated on

मणिपूरमध्ये गेल्या दोन महिन्याहून अधिक काळ हिंसाचाराने थैमान घातलं आहे. या हिंसाचारामध्ये दोन महिन्यांत जवळपास १७० हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. इथे असलेली अशांतता पाहून एका सेवानिवृत्त सैन्य अधिकाऱ्याला राज्यामध्ये शांतता स्थापित करण्याची जबाबदारी दिली आहे. कोण आहे हा अधिकारी? जाणून घ्या.

हे तेच सेवानिवृत्त अधिकारी आहेत ज्यांनी २०१५ साली भारतातल्या सर्जिकल हल्ल्यांच्या काळामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. २४ ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त कर्नल नेक्टर संजेनबम यांना मणिपूर सरकारने पाच वर्षांसाठी मणिपूर पोलीस खात्यामध्ये वरिष्ठ अधीक्षक पदावर नियुक्त केलं आहे. कर्नल संजेनबम यांना देशातला दुसरा सर्वात मोठा शौर्य पुरस्कार किर्ती चक्र आणि तिसरा सर्वात मोठा पुरस्कार शौर्य चक्र देऊन सन्मानित करण्यात आलं आहे.

Manipur Violence: कोण आहेत निवृत्त सैन्य अधिकारी ज्यांच्या खांद्यावर आहे मणिपूर शांत करण्याची जबाबदारी? जाणून घ्या...
Manipur Violence : कुकी आणि मैतेई समुदायात संघर्ष सुरूच; तीन दिवसांत मणिपूरमध्ये पाच ठार

मणिपूरचे संयुक्त गृह सचिव यांच्याकडून २८ ऑगस्ट रोजी एक आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशानुसार ही नियुक्ती १२ जूनच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर कऱण्यात आली आहे. या अधिकाऱ्यासाठी शौर्य चक्रासोबत दिलेल्या प्रशस्तीपत्रकात लिहिलं आहे, "सर्वात आव्हानात्मक परिस्थितीमध्ये सावधानपूर्वक नियोजन, अनुकरणीय शौर्य, साहसी कारवाई केल्याप्रकरणी हा पुरस्कार देण्यात येत आहे."

एन बीरेन सिंह यांचं सरकार आणि केंद्र सरकार दोघेही मिळून या राज्यामध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराला रोखण्याचा प्रयत्न सातत्याने करत आहे. याच दरम्यान या निवृत्त सेना अधिकाऱ्याची नियुक्ती झाली आहे. गेल्या पाच दिवसांमध्ये मैतेई बहुसंख्य भागामध्ये आणि कुकी बहुसंख्य भागामधल्या लोकांमध्ये सीमावर्ती भागात स्फोट आणि गोळीबार झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये १० पेक्षाही जास्त लोक मृत्यूमुखी पडल्याचं वृत्त आहे.

Manipur Violence: कोण आहेत निवृत्त सैन्य अधिकारी ज्यांच्या खांद्यावर आहे मणिपूर शांत करण्याची जबाबदारी? जाणून घ्या...
Manipur Violence: मणिपूर हिंसाचारप्रकरणी स्थापन केलेल्या समितीकडून सुप्रीम कोर्टात 3 रिपोर्ट सादर

या हल्ल्यामध्ये ३० हून अधिक लोक गंभीर जखमी झाल्याचीही माहिती हाती येत आहे. ही अशांतता भडकण्याचं कारण म्हणजे उच्च न्यायालयाने दिलेला आदेश. इंडिया टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, उच्च न्यायालयाने राज्य सरकारला मैतेई समाजाला अनुसुचित जमातीचा दर्जा देण्याची शिफारस कऱण्यास सांगितलं होतं.

या आदेशाचा विरोध करण्यासाठीच ऑल ट्रायबल स्टुडंट्स युनियन कडून ३ मे रोजी शांतिपूर्ण विरोध दर्शवण्याचं नियोजन कऱण्यात आलं होतं. मात्र हाच विरोध पुढे हिंसक झाला. याचं कारण म्हणजे काही भागांमध्ये कुकी आणि मैतेई दोन्ही समाजातल्या लोकांमध्ये तणाव निर्माण झाला. या तणावामुळे अनेक लोक मारले गेले, काही गंभीर जखमी झाले, तर हजारो लोक विस्थापित झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.