इंफाळ : मणिपूरमध्ये सध्या महिलांच्या व्हिडिओचा मुद्दा ऐरणीवर असून इथली कायदा-सुव्यवस्था अक्षरशः उद्ध्वस्त झाली आहे. महिलांची विवस्त्र धिंड काढल्याच्या व्हिडिओमुळं देश हादरला आहे. पण अशा अनेक घटना इथं घडल्या आहेत, अशी धक्कादायक कबुली मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी दिली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलाताना त्यांनी ही कबुली दिली. (Manipur Violence Shocking confession of CM Biren Singh regarding women atrocities virla video)
CM बिरेन सिंह म्हणाले, "मणिपूरमध्ये सध्या दररोज हिंसाचार सुरु आहे. अनेक लोक यामध्ये मारले गेले आहेत हजारो लोकांवर एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. दोन महिलांना विवस्त्र करुन त्यांची धिंड काढण्यात आल्याचा व्हिडिओ कालच समोर आला आहे.
अशाच घटनासांठी इथं शेकडो एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. आपण आमच्यावर आरोप करण्यापेक्षा ग्राऊंड रिअॅलिटी काय आहे? हे पाहिलं पाहिजे. राज्यात या घटनेप्रमाणे शेकडो केसेस झाल्या आहेत त्यामुळेच इथं इंटरनेट बंद करण्यात आलं आहे" (Marathi Tajya Batmya)
या घटनेचा मी निषेध करतो. हे सर्वात हिणकस असं गुन्हेगारी कृत्य आहे. याप्रकरणी आम्ही एका व्यक्तीला पकडलं असून त्याच्यासह जो पण या घटनेत सहभागी असेल त्याला मृत्यूदंडासारखी शिक्षा देण्यात येईल. (Latest Marathi News)
मणिपूरमधील जे व्हिडिओ समोर आले आहेत. ती घटना ४ मे २०२३ रोजी घडली आहे त्यावर १८ मे २०२३ रोजी एफआयआर दाखल झाल्याचं इंडिया टुडेनं म्हटलं आहे. पण या घटनांची माहिती आत्ताच समोर आल्याचं मुख्यमंत्र्यांकडून सांगितलं जात असल्यानं अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.