Manipur Violence:मणिपूरमध्ये संकट! दंगलखोरांच्या हातात ३ हजार AK-47, सुरक्षा दलांचे गणवेश आणि गाड्याही

Stolen Arms in Manipur:सध्या पोलीस ठाणे आणि प्रशिक्षण केंद्रातून लुटलेली ३ हजार शस्त्रे आणि दारूगोळा दंगलखोरांच्या हाती आहे. त्यात 'AK-47' आणि इतर प्रकारच्या घातक शस्त्रांचा समावेश आहे.
Manipur Violence:मणिपूरमध्ये संकट! दंगलखोरांच्या हातात ३ हजार AK-47, सुरक्षा दलांचे गणवेश आणि गाड्याही
Esakal
Updated on

Stolen Weapons and Uniform in Manipur:मणिपूरमध्ये ३ मे रोजी सुरू झालेला हिंसाचार अद्याप पूर्णपणे थांबलेला नाही. मणिपूर सरकारने साडेचार महिन्यांच्या जातीय हिंसाचारानंतर इंटरनेटवरील बंदी उठवली असली तरी तेथील आव्हानं संपलेली नाहीत. सध्या पोलीस ठाणे आणि प्रशिक्षण केंद्रातून लुटलेली ३ हजार शस्त्रे आणि दारूगोळा दंगलखोरांच्या हाती आहे. त्यात 'AK-47' आणि इतर प्रकारच्या घातक शस्त्रांचा समावेश आहे. आता मणिपूर सरकार आणि सुरक्षा दलांसमोर नवंआव्हान उभं राहिलय.

म्हणजेच सुरक्षा दलांप्रमाणेच गणवेश आणि वाहने वापरणारे दंगलखोर फिरत आहेत. 'आसाम रायफल' सारखी वाहने राज्यात दंगलखोरांकडे गटाकडे बघायला मिळत आहेत. हल्ल्यादरम्यान, हल्लेखोर कोणत्या ना कोणत्या गणवेशात दिसतात. आता मणिपूर सरकारने पुन्हा लुटलेली शस्त्रे परत करण्याचे आवाहन केले आहे. अशा लोकांना दोन आठवड्यांचा वेळ देण्यात आला आहे. त्यानंतर बेकायदेशीर शस्त्रसाठा आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.

व्यापक शोध मोहीम

मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी सांगितले की, जर बेकायदेशीर शस्त्रे १५ दिवसांत जमा केली गेली तर त्यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्यांचा विचार केला जाईल. बिरेन सिंह म्हणाले, राज्यातील परिस्थिती सुधारली आहे, त्यामुळे इंटरनेट बंदी उठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन आठवड्यांनंतर अवैध शस्त्रे जप्त करण्यासाठी राज्यभर जोरदार आणि मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम सुरू होईल. त्यावेळी कोणीही बेकायदेशीर शस्त्र बाळगताना आढळल्यास त्याच्यावर गंभीर कारवाई केली जाईल.

पोलिस स्टेशन आणि प्रशिक्षण केंद्रातून लुटलेली शस्त्रे वापरून दंगलखोर रस्ते अडवत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. खंडणी व धमक्या दिल्या जात आहेत. सुरक्षा दलांवर हल्ले करत आहेत. लोकांचे अपहरण करण्यासाठीही याच शस्त्रांचा वापर केला जात आहे. मणिपूरमधील हिंसाचारात आतापर्यंत 180 लोकांचा मृत्यू झाला आहे. 70 हजारांहून अधिक लोक छावण्यांमध्ये राहत आहेत.

Manipur Violence:मणिपूरमध्ये संकट! दंगलखोरांच्या हातात ३ हजार AK-47, सुरक्षा दलांचे गणवेश आणि गाड्याही
Narendra Modi : विशेष अधिवेशन कशासाठी हेच कळलं नाही; ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा टोला

गणवेश आणि सुरक्षा दलांसारखी वाहने

मणिपूरमध्ये तैनात असलेल्या केंद्रीय सुरक्षा दलाच्या एका अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की, सरकार राज्यात शांतता प्रस्थापित केल्याचा दावा करत असले तरी आव्हाने अद्याप संपलेली नाहीत. त्यापेक्षा असं म्हणता येईल की, दंगलखोरांकडून फसवणुकीच्या नव्या क्लृप्त्या वापरल्या जातात. सुरक्षा दलांमधील चकमकी ही नवीन गोष्ट नाही. यापूर्वीही अशी प्रकरणे समोर आली आहेत. मणिपूर पोलिसांनी आसाम रायफलविरोधात एफआयआरही दाखल केला आहे. आता तिथे नवा खेळ सुरू झाला आहे. सुरक्षा दलांमधील परस्पर विश्वासात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

दंगलखोरांनी आता सुरक्षा दलांसारखा गणवेश घालायला सुरुवात केली आहे. आसाम रायफल्ससारखे ट्रक वापरले जात आहेत. विशेषत: दुर्गम भागात राहणार्‍या लोकांना सुरक्षा दल आणि दंगलखोरांना ओळखण्यात अडचण येऊ शकते. विविध गटांशी संबंधित 'गाव आधारित बंडखोर गट' या कामात गुंतलेले आहेत. आसाम रायफल्ससमोर अशी अनेक उदाहरणे समोर आल्यावर तेथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मणिपूर पोलिसांना याबाबत माहिती दिली. यापूर्वीही राज्यात तैनात असलेल्या सुरक्षा दलांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे. सुरक्षा दल अनेकवेळा आमनेसामने आले आहेत.

Manipur Violence:मणिपूरमध्ये संकट! दंगलखोरांच्या हातात ३ हजार AK-47, सुरक्षा दलांचे गणवेश आणि गाड्याही
S. Jaishankar:विकसित राष्ट्रांचा दुटप्पीपणा; एस जयशंकर यांनी ग्लोबल नॉर्थ देशांना सुनावलं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.