Manipur Violence Video : मोदी मणिपूरला का जात नाहीत? राहुल गांधींनी सांगितलं खरं कारण; म्हणाले...

Narendra modi and Rahul Gandhi
Narendra modi and Rahul Gandhiesakal
Updated on

नवी दिल्लीः देशाचा एक भाग जळतोय तरीही देशाचे पंतप्रधान गप्प कसे? असा प्रश्न काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे. काँग्रेसच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरुन एक व्हीडिओ ट्वीट करण्यात आलेला आहे. त्यामध्ये राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अनेक आरोप केलेत.

व्हीडिओमध्ये राहुल गांधी म्हणतात, मणिपूरमध्ये काय होतंय ते देश बघतोय. परंतु पंतप्रधानांनी मणिपूरबद्दल एक शब्दही काढला नाही. देशाचा एक प्रदेश जळत असतांना देशाच्या पंतप्रधानांनी काहीतरी बोललं पाहिजे. विमानाने जावून कमीत कमी लोकांशी चर्चा करतील, असं वाटत होतं. परंतु नरेंद्र मोदी गप्प आहेत.

Narendra modi and Rahul Gandhi
Nawab Malik: नवाब मलिकांच्या पाठिंब्याचं ठरलं? मुलगी सना मलिक अजित पवारांच्या भेटीसाठी विधान भवनात दाखल

राहुल गांधी पुढे म्हणाले, काँग्रेसचे पंतप्रधान असते तर तिथेच बसले असते. मागे होऊन गेलेले कोणतेही पंतप्रधान असते तर अशी वेळ बघावी लागली नसती. देशाचे पंतप्रधान मणिपूरबद्दल का बोलत नाहीत? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याचं कारण ते निवडक लोकांचे पंतप्रधान आहेत.

''नरेंद्र मोदी हे आरएसएसचे पंतप्रधान आहेत, त्यांना मणिपूरशी काही देणंदेघणं नाही. त्यांना माहितंयत त्यांच्या विचारधारेमुळेच मणिपूर जळात आहे. मणिपूरमध्ये महिलांवर जो अन्याय होतोय, त्यामुळे मोदींना काहीही फरक पडत नाही'' असा टोला राहुल गांधी यांनी मोदींना लगावला.

Narendra modi and Rahul Gandhi
Highest Taxpayer in India: अंबानी-अदानी नाही तर 'ही' व्यक्ती भारतात सर्वाधिक Income Tax भरते

दरम्यान, मागच्या तीन महिन्यांपासून मणिपूरमध्ये मैतेई आणि कुकी समाजामध्ये संघर्ष सुरु आहे. गेल्या आठवड्यात मणिपूरमधला एक व्हीडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये दोन महिलांची जमावाने नग्न धिंड काढल्याचं दिसून येतंय. त्यानंतर एका महिलेवर जमावाने अत्याचार केला. असे अनेक प्रकार मणिपूरमध्ये घडल्याचं सप्ष्ट होतंय. त्यामुळेच विरोधक केंद्रातील आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांवर आसूड ओढत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.