Manish Sisodia : सिसोदिया प्रामाणिक व्यक्ती, पण...; BJPच्या ज्येष्ठ नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण

manish sisodia
manish sisodia
Updated on

नवी दिल्ली - दिल्लीतील केजरीवाल सरकारमधील (Kejriwal Government) दोन मंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) आणि सत्येंद्र जैन (Satyendra Jain) यांनी पदाचा राजीनामा दिलाय. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दोघांचा राजीनामा स्वीकारला आहे. दारू घोटाळ्यावरून सिसोदिया यांना अटक करण्यात आली आहे. मात्र त्यांच्या अटकेवर भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने आक्षेप घेतला आहे.

manish sisodia
Anna Hajare : 'अण्णा हजारेंचा गौरवशाली वारसा बदनाम केला; भाजपचा 'आप'वर हल्लाबोल

भाजपचे ज्येष्ठ नेते शांता कुमार यांनी सिसोदियांच्या अटकेवर म्हटलं की, ते प्रामाणिक नेते आहेत. त्यांची प्रतिमा स्वच्छ असल्याचं सांगत त्यांनी कौतुक केलं आहे. मात्र ते आज कारागृहात बंद असून दोन्ही बाजुने आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहे. मात्र कोणत्याही कारणाशिवाय सीबीआय त्यांना कारागृहात टाकेल, असं होऊ शकत नाही, असंही ते म्हणाले.

manish sisodia
Sanjay Raut : राऊतांना पुन्हा जेलमध्ये पाठविण्याची तयारी? हक्कभंग समिती नव्याने स्थापण्याच्या हालचाली

शांता कुमार म्हणाले की, सिसोदिया यांचं शिक्षण क्षेत्रातील काम कौतुकास्पद आहे. तरी देखील ते भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकले. यातून एकच निष्कर्ष निघतो की, भ्रष्टाचार किती खोलवर गेला आहे. प्रामाणिकपणाच्या स्टेशनवरून निघालेली प्रत्येक गडी भ्रष्टाचाराच्या स्टेशनवर पोहोचत असल्याचंही कुमार यांनी नमूद केलं.

दरम्यान सिसोदिया हे प्रामाणिक आहेत. मात्र पक्ष आणि निवडणुका लढविण्यासाठी त्यांनी संपत्ती जमा केली असावी, असा दावाही शांता कुमार यांनी केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()