नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची सर्वोच्च न्यायालयाने जामीनावर सुटका केल्यानंतर आम आदमी पक्षाच्या (आप) अंतर्गत नेतृत्वाचा प्रश्न सुटल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल कारागृहात असल्याने आता मनीष सिसोदिया यांनी पक्षाची सूत्रे घेतली आहेत.