Manish Sisodia : मनीष शिसोदिया यांच्या कोठडीत 8 मे पर्यंत वाढ

ईडी’च्या प्रकरणात न्यायालयाने सिसोदिया यांची कोठडी वाढवली आहे
AAP  Manish Sisodia
AAP Manish Sisodia esakal
Updated on

नवी दिल्ली ः मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी आम आदमी पक्षाचे(आप) नेते मनीष सिसोदिया यांच्या कोठडीत आठ मे पर्यंत वाढ झाली आहे. या प्रकरणातील अन्य आरोपींच्या कोठडीत देखील विशेष न्यायालयाने वाढ केली.

AAP  Manish Sisodia
Nashik News : स्टार्टअप समिट नवनवीन कलाविष्कारांना प्रोत्साहन : जिल्हाधिकारी जलज शर्मा

मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणी सक्त वसुली संचालनालय (ईडी) तसेच केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) सिसोदिया यांची कोठडीत चौकशी सुरू आहे. ‘ईडी’च्या प्रकरणात न्यायालयाने सिसोदिया यांची कोठडी वाढवली आहे. अलीकडेच सीबीआयच्या प्रकरणात त्यांना सात मे पर्यंत कोठडी देण्यात आली होती. सीबीआयने गतवर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात सिसोदिया यांना अटक केली होती. त्यानंतर मार्च महिन्यात ईडीकडून त्यांना अटक झाली होती. मागील वर्षभराहून जास्त काळ सिसोदिया हे तिहार तुरुंगात बंद आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.