भाजप AAP ला घाबरतेय, अमित शाहांच्या 'त्या' निर्णयानंतर सिसोदियांचं वक्तव्य

Manish Sisodiya on Amit Shah Decision About Chandigarh
Manish Sisodiya on Amit Shah Decision About ChandigarhTeam eSakal
Updated on

नवी दिल्ली : आपच्या वाढत्या प्रभावामुळे भाजप (BJP) घाबरत असल्याचं वक्तव्य आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया (AAP Leader Manish Sisodiya) यांनी केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी चंदीगड या केंद्रशासित प्रदेशातील प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या नियमांनुसार सुविधा मिळतील, अशी घोषणा केली होती. त्यानंतर मनिष सिसोदिया यांनी हे वक्तव्य केलं आहे.

Manish Sisodiya on Amit Shah Decision About Chandigarh
'ऑपरेशन गंगा' चा विधानसभा निवडणुकांवर सकारात्मक परिणाम - अमित शाह

काँग्रेसने २०१७ ते २०२२ पर्यंत पंजाबवर राज्य केले. तेव्हा अमित शाह यांनी चंदीगडची सत्ता काढून घेतली नाही. पंजाबमध्ये आपचे सरकार बनताच अमित शाह यांनी चंदीगडची सत्ता काढून घेतली आहे. कारण आपचा वाढता प्रभाव पाहून भाजप घाबरले, असं मनिष सिसोदिया म्हणाले.

शिरोमणी अकाली दलाचा आक्षेप -

अमित शाहांच्या घोषणेवर आक्षेप घेणारा आप हा एकमेव पक्ष नाही. शिरोमणी अकाली दलाने देखील या निर्णयाला पंजाबविरोधी म्हटले आहे. चंदीगडमधील कर्मचाऱ्यांवर केंद्र सरकारचे नियम लादण्याचा निर्णय पंजाब पुनर्रचना कायद्याच्या भावनेचे उल्लंघन करणारा आहे. भाजपने त्याचा विचार केला पाहिजे, असं शिरोमणी अकाली दलाचे प्रवक्ते आणि वरिष्ठ सरचिटणीस डॉ. दलजीत सिंग चिमा म्हणाले.

अमित शाह यांची घोषणा काय? -

चंदीगड प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांसाठी एक चांगली बातमी असून आजपासून त्यांना केंद्र सरकारचे नियम लागू होतील. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. निवृत्तीचे वयही 58 वर्षांवरून 60 वर्षे केले जाईल. जे शिक्षण क्षेत्रात आहेत ते ६५ व्या वर्षी निवृत्त होतील. शिक्षकांनाही बालशिक्षण भत्ता मिळण्याचा हक्क असेल. महिला कर्मचाऱ्यांना दोन वर्षांपर्यंत बाल संगोपन आणि प्रसूती रजा मिळेल, अशी घोषणा अमित शाह यांनी रविवारी केली. तसेच याबाबत अधिसूचना सोमरवारी जारी केली जाईल आणि पुढील आर्थिक वर्षापासून लागू केली जाईल, असंही ते म्हणाले.

दरम्यान, विरोधकांनी भाजपच्या या निर्णयावर कडाडून टीका केल्यानंतर गृहमंत्रालयाने स्पष्टीकरण दिले आहे. या निर्णयामुळे पंजाबच्या अधिकारांवर कोणताही परिणाम होणार नाही, असं गृहमंत्रालयानं म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.