Mankind Pharma: एक चूक पडली महागात! द्यायचे होते 21 कोटी, अन् देऊन बसले 250 कोटी, काय आहे प्रकरण?

Mankind Pharma: गणित चुकलं अन्ं...कोविडच्या काळात मॅनकाइंड फार्माने दिले 250 कोटी, एका चुकीची किंमत गेली 10 पट जास्त रक्कमेत, काय आहे प्रकरण?
Mankind Pharma
Mankind PharmaEsakal
Updated on

मॅनकाइंड फार्माचे व्यवस्थापकीय संचालक (MD) राजीव जुनेजा यांनी कोविड-19 महामारीच्या काळात मदतीसाठी 250 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. जुनेजा यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. यूट्यूबर रणवीर अलाहाबादियाशी सुरू असलेल्या चर्चेवेळी जुनेजा यांनी सांगितले की, प्रत्यक्षात त्यांच्या एका चुकीमुळे त्यांना मोठी रक्कम द्यावी लागली. मुलाखतीच्या दरम्यान जुनेजा यांनी यासंबंधीचा संपूर्ण किस्सा शेअर केला. हे गणित कसं चुकलं ते जाणून घेऊया.

"द रणवीर शो" या पॉडकास्ट कार्यक्रमामध्ये अलाहाबादियाशी बोलताना, 58 वर्षीय जुनेजा म्हणाले, कोविड -19 च्या काळात मदतीसाठी देणगी देण्याबद्दल त्यांच्या घरी चर्चा झाली. "आमच्या घरी वाद झाला. आम्हाला वाटले की आमच्याकडे खूप काही आहे आणि आम्ही मदत दिलीच पाहिजे. आम्ही 21 कोटी रुपये दान करण्याचा विचार केला. पण माझा मुलगा म्हणाला, तुमचा एवढा मोठा व्यवसाय आहे, तुम्ही आणखी देणगी द्यावी. त्याचवेळी अक्षय कुमारने 50 कोटी रुपयांची देणगी दिल्याची बातमी आली होती. माझा मुलगा माझ्याकडे आला आणि त्याने पुन्हा आग्रह केला आणि आम्ही लगेचच मदत करण्याची निर्णय घेतला."

जुनेजा पुढे म्हणाले, "आपण एका हाताने देत असताना दुसऱ्या हाताला कळू नये, अशी एक प्रचलित म्हण आहे. मला वाटते की दुसऱ्या हाताला कळले पाहिजे, कारण त्यातून इतरांना प्रेरणा मिळते. आम्हाला वाटले की, आपण डॉक्टरांसाठी काहीतरी करूया, आधी पंतप्रधान निधी, नंतर इतर निधी आणि ऑक्सिजन सिलिंडर आम्ही खूप काही दान केले. हा एक भावनिक निर्णय होता".

Mankind Pharma
Ayodhya Shri Ram Mandir : विशेष निमंत्रितांना निमंत्रणपत्रिका पोहोचल्या

चुकीचं गणित कसं झालं?

मॅनकाइंड फार्मा ने घोषणा केली की ते केमिस्ट, पोलीस अधिकारी, परिचारिका किंवा डॉक्टरांसह कोणत्याही आघाडीच्या कामगारांच्या मृत्यूवर एक निश्चित रक्कम दान करतील. चुकीच्या गणिताबद्दल बोलताना जुनेजा म्हणाले, “आम्हाला समजले की डॉक्टर आणि परिचारिकांचा मृत्यू होत आहेत आणि हे लक्षात घेऊन आम्ही अंदाज बांधू लागलो. या गणनेत एक शून्य कमी होता".

ते म्हणाले, “या चुकीच्या गणितामुळे आम्हाला आम्ही ठरवलेल्यापेक्षा १० पट जास्त देणगी द्यावी लागली. त्यामुळे आम्ही त्यावेळी सुमारे 250 कोटी रुपये दिले. आम्ही कोणतीही अपेक्षा न ठेवता दिले. पण आम्हाला खूप प्रेम आणि दाद मिळाली. हे सर्व अनपेक्षित होते. तसेच झाले. एका चुकीमुळे काहीतरी मोठे झाले."

Mankind Pharma
फॉर्म्युला ठरला! काँग्रेसला दिल्लीमध्ये 3 जागा देण्यास आप तयार; पण, गुजरात, हरियाणा, गोव्यात हव्या इतक्या जागा?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.