Manmohan Singh Birthday : मनमोहन सिंग यांनीही सर्व्ह केला होता ४ महिन्यांचा नोटीस पीरियड; जाणून घ्या तो किस्सा

Manmohan Singh Birthday
Manmohan Singh Birthday
Updated on

आज कोणी नोकरी बदलत असेल तर त्याला २ ते ३ महिने नोटीस पिरियड पूर्ण करावा लागतो. लहान मोठ्या सर्व कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोकरी बदलताना २ ते ३ महिने नोटीस पीरियड पूर्ण करणे आवश्यक असते. नोटीस पीरियड पूर्ण केला नाही तर कंपन्यांकडून त्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करत त्यांना ब्लॅक लिस्ट किंवा फुल अँड फायनल पेमेंटमधून पैसे कापले जातात.

यासंबंधी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या संबंधीचा एक ५५ वर्षांपू्र्वीचा किस्सा प्रसिद्ध आहे. जेव्हा त्यांनी आपली नोकरी बदलण्यासाठी २ किंव ३ नव्हे तर तब्बल चार महिन्याचा नोटीस पीरियड सर्व्ह केला होता.

डॉ. मनमोहन सिंग यांनी भारताचे पंतप्रधान बनण्यापूर्वी अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. भारताचे पंतप्रधान यापेक्षा त्यांची खरी ओळख जगातील एक नामांकित अर्थतज्ज्ञ अशीच आहे. त्यांची इकॉनॉमिक थेअरी ऑक्सफर्ड विद्यापिठात शिकवली जाते. तसेच केंब्रिज विद्यापीठात त्यांच्या नावावर ग्रॅज्युएशन स्टूडंट्ससाठी स्कॉलरशिप देखील दिली जाते. असे असताना देखील मनमोहन सिंग यांचे जिवन अत्यंत साध्या पद्धतीचे राहिले आहे.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना ४ महिने नोटीस पीरियड सर्व्ह करावा लागल्याचा हा किस्सा १९६९ सालचा आहे. तेव्हा पंजाप युनिव्हर्सिटीमध्ये ते इकॉनॉमिक्सचे प्रोफेसर होते. यादरम्यान न्यूयॉर्कमध्ये एका कार्यक्रमादरम्यान त्यांची भेट के.एन.राज यांच्यासोबत झाली. तेव्हा ते दिल्ली विद्यापीठातील दिल्ली स्कूल ऑफ इकोनॉमिक्सचे डायरेक्टर होते. त्यांनी मनमोहन सिंग यांना दिल्ली युनिव्हर्सिटीत जॉइन करण्याची ऑफर दिली होती.

Manmohan Singh Birthday
Manmohan Singh Birthday : दीर्घायुषी व्हा! PM मोदी, शरद पवारांकडून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना शुभेच्छा

तेव्हा दिल्ली स्कूल ऑफ इकोनॉमिक्सची ओळख ही नॅशनल आणि इंटरनॅशनल पातळीवर अनेक दिग्गज लोक येथे शिकून बाहेर पडले आहेत अशी होती. तसेच या संस्थेची खासियत होती की येथील प्रोफेसर आणि विद्यार्थी हे नंतर बऱ्याचदा भारत सरकारमध्ये काम करत. मनमोहन सिंग दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स जॉइन करण्याचा प्रस्ताव नाकारू शकले नाहीत.

मनमोहन सिंग यांनी पंजाब विद्यापीठात बराच काळ काम केलं होतं, त्यामुळे तेथील नोकरी सोडणे त्यांच्यासाठी सोपे नव्हते. पंजाब विद्यापीठाचे कुलगुरू ए. सी. जोशी यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला नाही, उलट त्यांना काही दिवस रजेवर जाण्यास सांगितले. पण मनमोहन सिंग यांनी दिल्लीत येण्याचा निर्णय घेतला होता. मार्च १९६९ मध्ये त्यांनी पंजाब विद्यापीठाचा राजीनामा दिला. काही दिवसांतच कुलगुरू सूरज भान यांनी त्यांना पत्र लिहून त्यांच्या निर्णयावर पुनर्विचार करण्यास सांगितले.

मनमोहन सिंग यांची मुलगी दमन सिंग यांनी त्यांच्या 'स्ट्रिक्टली पर्सनल: मनमोहन अँड गुरशरण' या पुस्तकात नमूद केले आहे की, नोकऱ्या बदलताना विद्यापीठाला स्मूद ट्रांजिशन हवे होते. त्यामुळे मनमोहन सिंग यांनी एका महिन्याच्या नोटीस पीरियड कालावधीऐवजी ४ महिन्यांचा नोटीस पीरीयड सर्व्ह केला.

Manmohan Singh Birthday
Manmohan Singh Birthday: एक निर्णय अन् 30 वर्षात कोट्यवधी लोक आले गरिबीतून बाहेर, असं होतं मनमोहन सिंग यांचं अर्थकारण

देशाचे भविष्य बदलणारे निर्णय

मनमोहन सिंग यांचा त्यांच्या कामाबद्दलचा हा प्रामाणिकपणा पंतप्रधान झाल्यानंतरही दिसून आला. त्यांच्या सरकारने देशातील करोडो लोकांना गरिबीतून बाहेर काढण्याचे काम केले. ग्रामस्थांना रोजगार हमी देण्यासाठी मनरेगा कायदा केला, उपासमारीपासून मुक्ती देण्यासाठी अन्न सुरक्षा कायदा केला गेला आणि सर्वांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी 'शिक्षणाचा अधिकार' हा मूलभूत अधिकार बनवला. मनमोहन सिंग यांचा आज वाढदिवस असून आज ते ९१ वर्षांचे झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.