Haryana Nuh violence : मणिपूरनंतर आता हरियाणाही पेटलं! हिंसाचारात ६ मृत्यू तर ११६ जणांना अटक

manohar lal khattar Haryana Nuh violence Six people killed  Several injured 116 people arrested
manohar lal khattar Haryana Nuh violence Six people killed Several injured 116 people arrested
Updated on

मणिपूरमध्ये मागील काही महिन्यांपासून हिंसाचाराच्या घटना समोर येत आहेत. यादरम्यान आता हरियाणामध्ये देखील हिंसाचाराच्या घटना समोर आल्या आहेत. हरियाणात सुरू असलेल्या हिंसाचारात सहा लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन होमगार्ड आणि ४ नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी दिली आहे.

तसेच या घटनेनंतर केंद्रीय सुरक्षा दलाच्या २० कंपन्यांपैकी ३ पलवन, २ गुरुग्राम, १ फरिदाबाद आणि १४ कंपन्या नुह येथे तैनात करण्यात आल्या असून ११६ जणांना अटक करण्यात आले आहे. माझी जनतेला शांतता राखण्याची आणि कुठलाही अनुचित प्रकार थांबवण्याचे आवाहन करतो असेही एमएल खट्टर म्हणाले.

नुह जिल्ह्यातील हिंसाचारात सहा जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. नुह घटनेत ज्यांना जीव गमवावा लागला त्यात दोन होमगार्ड आणि चार नागरिकांचा समावेश आहे. यादरम्यान मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. दोषी आढळणाऱ्यांना सोडले जाणार नाही, असेही खट्टर म्हणाले.

manohar lal khattar Haryana Nuh violence Six people killed  Several injured 116 people arrested
Monsoon Session : "तर नवीन प्रश्न..."; थोरात-विखे विधानसभेत भिडले; अध्यक्षांची कोपरखळी

आम्ही जनतेच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध असून एकूणच राज्यातील परिस्थिती सामान्य आहे. हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले. सीएम मनोहर लाल म्हणाले की, नुह आणि आसपासच्या भागात परिस्थिती सामान्य आहे, सुरक्षा यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्यात आले आहे. ३१ जुलै रोजी दोन गटांमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर नुहला लागून असलेल्या फरिदाबाद, पलवल आणि गुरुग्राम जिल्ह्यात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

मंगळवारी हरियाणातील इतर अनेक जिल्ह्यांतून हिंसाचाराच्या घटना समोर आल्या होत्या. गुरुग्राममधील बादशाहपूर आणि सोहना रोड येथे हिंसाचाराच्या घटना घडल्या. नूहमध्ये सोमवारी मध्यरात्रीपासून ४८ तासांसाठी कलम १४४ लागू करण्यात आले असून जिल्ह्यात मोबाईल इंटरनेट सेवा तात्पुरती बंद करण्यात आली.

manohar lal khattar Haryana Nuh violence Six people killed  Several injured 116 people arrested
Nitin Desai News : नितीन देसाईंचं ठाकरे कनेक्शन; अवघ्या २० तासात अविस्मरणीय बनवला 'तो' खास क्षण

राज्यातील परिस्थितीवर बोलताना सहाय्यक पोलिस आयुक्त वरुण दहिया (गुन्हे), गुरुग्राम यांनी आज सांगितले की सर्व शाळा, महाविद्यालये आणि कामाची ठिकाणे सामान्यपणे कार्यरत आहेत. वाहतुकीच्या कोणतेही निर्बंध नाहीयेत. तसेच इंटरनेटही सुरू आहे. मी सर्वांना आवाहन करतो की, सोशल मीडियावरील अफवांकडे लक्ष देऊ नका. कोणाला काही माहिती द्यायची असल्यास '११२' या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधू शकता.

मात्र दुसरीकडे हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला म्हणाले की, यात्रेच्या आयोजकांनी यात्रेची माहिती जिल्हा प्रशासनाला दिली असती तर नुह जिल्ह्यातील हिंसाचार टाळता आला असता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()