Karnal Lok Sabha Result: माजी मुख्यमंत्र्यांनी प्रतिष्ठा राखली, अडीच लाखांनी मिळवला विजय

Manohar Lal Khattar: खट्टर यांनी कर्नाल मतदारसंघातून विधानसभेच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आणि त्यांचे उत्तराधिकारी आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नायब सैनी यांच्यासाठी जागा रिकामी केली होती.
Manohar Lal Khattar Karnal Lok Sabha Result
Manohar Lal Khattar Karnal Lok Sabha ResultEsakal
Updated on

यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी, भारतीय जनता पक्षाने माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना उमेदवारी दिली होती. दरम्यान, काँग्रेसने 31 वर्षीय हरियाणा युवक काँग्रेसचे अध्यक्ष दिव्यांशु बुधीराजा यांना उमेदवारी दिली होती.

यामध्ये मनोहर लाल खट्टर यांना 737282 मते मळाली असून, त्यांनी सुमारे अडीच लाख मतांनी विजय मिळवला आहे.

दरम्यान कर्नालमध्ये भाजपचे मनोहर लाल हे काँग्रेसचे दिव्यांशु बुधीराजा यांच्यापेक्षा २ लाख १० हजार ५९ मतांनी पुढे आहेत.

या वर्षाच्या सुरुवातीला, खट्टर यांनी कर्नाल मतदारसंघातून विधानसभेच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आणि त्यांच्या उत्तराधिकारी आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नायब सैनी यांच्यासाठी जागा रिकामी केली होती.

कोणाची ताकद कीती?

हरियाणातील कर्नाल लोकसभा मतदारसंघात कर्नाल आणि पानिपत जिल्ह्यांतील नऊ विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.

यामध्ये भाजपकडे सहा, उंद्री, कर्नाल, घारौंडा, पानिपत ग्रामीण आणि पानिपत शहर आणि एका अपक्षाचा समावेश असलेल्या जागांचा समावेश आहे.

दुसरीकडे असंध, इसराना (राखीव मतदारसंघ) आणि समलखा या उर्वरित तीन विधानसभा क्षेत्रांचे प्रतिनिधित्व काँग्रेसने केले आहे.

इतिहासाच्या चौकटीतून, कर्नाल लोकसभा मतदारसंघांतर्गत येणारे कर्नाल आणि पानिपत जिल्ह्यांना देशाच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. पानिपतच्या मातीवर झालेल्या तीन लढाया भारतीय इतिहासात कायमच्या कोरल्या गेल्या आहेत.

Manohar Lal Khattar Karnal Lok Sabha Result
Sultanpur Lok Sabha Result: भाजपच्या गांधींना जोरदार धक्का, मनेका यांचा 37 हजार मतांनी पराभव

2019 मध्ये कोण जिंकले?

यापूर्वी, लोकसभेच्या जागेचे प्रतिनिधित्व भाजपचे उमेदवार अश्विनी चोप्रा (2014) आणि संजय भाटिया (2019) केले होते.

कर्नाल लोकसभा निवडणूक 2019 मध्ये, भाजप उमेदवार संजय भाटिया यांनी एकतर्फी आघाडी मिळवून विक्रमी मतांनी विजय मिळवला. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार कुलदीप शर्मा यांचा पराभव केला.

संजय भाटिया यांना 911594, म्हणजेत 70.8 टक्के मते आणि कुलदीप शर्मा यांना 255452 म्हणजेच 29.2 टक्के मते मिळाली.

2014 पासून भाजपने कर्नाल लोकसभा जागा ताब्यात घेतली आहे. अश्वनी कुमार यांनी याआधी 2014 मध्ये भाजपकडून जागा जिंकली होती.

ऐतिहासिकदृष्ट्या, कर्नाल लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, काँग्रेसने 1952 पासून 11 वेळा विजय मिळवला आहे. याउलट, भाजपने ही जागा केवळ पाच वेळा जिंकली आहे.

Manohar Lal Khattar Karnal Lok Sabha Result
Raebareli Lok Sabha Election Result: रायबरेलीत कुटुंबाची प्रतिष्ठा राखली; काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात राहुल गांधींचा विजय

स्थानिक मुद्दे

कर्नाल नेव्हल एअरस्ट्रिप देशांतर्गत विमानतळ गेल्या लोकसभा निवडणुकीतही प्रमुख मुद्दा होता. त्यावेळी भाजपने कर्नालमध्ये विमानतळ बांधणार असल्याचे आश्वासन दिले होते. पण हा मुद्दा अजूनही तसाच आहे.

कर्नालच्या रोजगार आणि विकासाच्या दृष्टिकोनातून, माजी मुख्यमंत्री मनोहर लाल यांनी लोकांना आश्वासन दिले होते की कर्नालला फार्मा हब बनवले जाईल. त्यासाठी जमिनही निवडण्यात आली, मात्र हा प्रकल्प अद्यापही फायलींमध्येच दबला आहे.

खराब रस्ते आणि राज्य महामार्गांची दुरवस्था हा लोकसभा निवडणुकीत महत्त्वाचा मुद्दा होता. विशेषतः कर्नाल शहराला इतर शहरांशी जोडणारे रस्ते खराब आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()