Manohar Parrikar Birth Anniversary:  मनोहर पर्रिकरांचे अविस्मरणीय किस्से

manohar parrikar
manohar parrikar
Updated on

Manohar Parrikar Birth Anniversary: राजकारणी म्हटलं की आरोपप्रत्यारोपाच्या गर्तेत अडकलेला माणूस. पण काही व्यक्ती त्याला छेद देऊन आपले वेगळं अस्तित्व निर्माण करतात आणि त्यांच्या या स्वभाव गुणामुळे ते कायम स्मरणातही राहतात. देशातील अशा मोजक्या व्यक्तिमध्ये ज्यांचे नाव येते ते नाव म्हणजे दिवंगत माजी केंद्रीय मंत्री आणि गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाचा कारभार पाहिलेला चेहरा तो म्हणजे मनोहर पर्रिकर. राजकीय कारकिर्दीत भ्रष्टाचाराच्या आरोपापासून कोसभरदूर राहिलेल्या पर्रिकरांची आज जयंती. या निमित्तानेच जाणून घेऊयात मनोहर पर्रिकरांसंदर्भातील (Manohar Parrikar) काही अविस्मरणीय गोष्टी.  

1. IIT त शिक्षण घेतलेले पहिले मुख्यमंत्री

मनोहर पर्रिकर (Manohar Parrikar) देशातील असे पहिले मुख्यमंत्री होते ज्यांच्याकडे IIT ची डिग्री होती. त्यांनी मुंबईतील प्रतिष्ठित IIT तून बीटेकची पदवी घेतली होती. त्यांच्यानंतर अरविंद केजरीवाल हे आयआटीयन मुख्यमंत्री झाले. 

2. कॅबिनेटमध्ये वर्णी लागलेले गोव्याचे पहिले नेता

मोदी सरकारच्या कॅबिनेटमध्ये संरक्षणमंत्री पदी त्यांची वर्णी लागली होती. यापूर्वी त्यांनी गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. कॅन्सरचे निदान झाल्यानंतरही 1 वर्षभर त्यांनी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार पाहिला. पंतप्रधान पदासाठी मोदींच्या नावाला समर्थन देणारा भाजपचे ते पहिले मुख्यमंत्री देखील होते. 

3. मोदींचे फॅन असलेल्या पर्रिकरांचे अडवाणींच्या विरोधातील वक्तव्य चांगलेच गाजले 
माजी आणि दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यानंतर भाजपचे दिग्गज नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या नावाचा बोलबाला होता. पक्षातील अनेक नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या अवतीभोवती असायचे. 2009 मधील लोकसभा निवडणुकीत भाजपच्या पराभवाचा पर्रिकरांना चांगलाच धक्का बसला होता. यावेळी त्यांनी अडवाणींविरोधात मोठे वक्तव्य केले होते. ‘सड़ा हुआ अचार’ असा उल्लेख करत अडवाणी युग संपवून मोदींसारख्या नेत्याला संधी द्यायला पाहिजे असे विधान त्यांनी केले. त्यांच्या या विधानाने राजकीय वातावरण चांगलेच तापले. पण पर्रिकरांवर कारवाई करण्याचे धाडस पक्षाला करता आले नाही.  

4. अमिर खानचीही घेतली होती शाळा
वादग्रस्त मुद्यावर रोखठोक मत मांडणाऱ्या पर्रिकरांनी बॉलिवूड अभिनेता अमिर खानचीही शाळा घेतली होती. देशात असहिष्णूतेचे वातावरण आहे. त्यामुळे पत्नी करिण रावला देश साडावा वाटतो, असे अमिर खान एका कार्यक्रमात म्हटला होता. हा मुद्दा देशात चांगलाच गाजला. त्यानंतर पर्रिकरांनी कठोर शब्दांत अमिर खानचा समाचार घेतला. पर्रिकर म्हणाले होते की, एक अभिनेता म्हणतोय की त्याच्या पत्नीला देशात सुरक्षित वाटत नाही. अशा अहंकारी लोकांना जनतेनं धडा शिकवायला हवा.   

5. सामान्य राहणीमान

काँग्रेस काळात पर्रिकरांनी अनेक घोटाळे समोर आणले. याशिवाय सत्तेत आल्यानंतरही साध्या रहाणीमानीनं ते चर्चेत होते. चप्पल आणि स्कूटरवर फिरणारा मुख्यमंत्री ही त्याची सामान्य छबी लोक कधीच विसरणार नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.