Congress News: गुजरात निवडणुकीत मोदींनी कोविडचे नियम पाळले होते का? आरोग्यमंत्र्यांच्या पत्रावर काँग्रेसचा हल्लाबोल

गुजरात निवडणुकीत पंतप्रधान मोदींनी कोविड प्रोटोकॉलचे सर्व नियम पाळलेत का?
Bharat Jodo Yatra, Congress News
Bharat Jodo Yatra, Congress Newsesakal
Updated on
Summary

गुजरात निवडणुकीत पंतप्रधान मोदींनी कोविड प्रोटोकॉलचे सर्व नियम पाळलेत का?

नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया (Mansukh Mandaviya) यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांना 'कोविड प्रोटोकॉल'बाबत (Covid Protocol) लिहिलेल्या पत्रावर काँग्रेसनं जोरदार प्रहार केलाय. (Congress News)

Bharat Jodo Yatra, Congress News
Shashi Tharoor : काँग्रेसच्या शशी थरूरांना झालंय तरी काय? व्हीलचेअरवर बसून गाठलं संसद भवन!

या पत्रावरुन काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chaudhary) यांनी भाजपवर हल्लाबोल केलाय. ते म्हणाले, भारत जोडो यात्रा पाहून मोदी सरकार जळत आहे. सर्वसामान्यांचं लक्ष वळवण्यासाठी ते विविध समस्या निर्माण करत आहेत. भाजपला विचारायचं आहे की, गुजरात निवडणुकीत पंतप्रधान मोदींनी कोविड प्रोटोकॉलचे सर्व नियम पाळलेत का? पंतप्रधान मोदींनी मास्क घालून घरोघरी प्रचार केला होता का? मला वाटतं, मनसुख मांडविया यांना राहुल गांधींची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) आवडत नाही, पण लोकांना ती आवडलीये. लोक यात गुंतत आहेत, असं त्यांनी स्पष्ट केलं. याशिवाय, काँग्रेस नेते पवन खेरा यांनी सरकारला कोविड धोक्यासाठी संसदेचं अधिवेशन थांबवणार का? असा सवाल केलाय.

Bharat Jodo Yatra, Congress News
Delhi High Court : मुलांवर लैंगिक अत्याचाराचा परिणाम भयानक असू शकतो; High Court चं महत्वाचं विधान

आरोग्यमंत्र्यांनी राहुल गांधींना लिहिलं पत्र

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी काल म्हणजेच, 20 डिसेंबर रोजी राहुल गांधी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना पत्र लिहिलं होतं. पत्रात त्यांनी 'भारत जोडो यात्रे'मध्ये कोविड नियमांचं पालन करावं किंवा यात्रा पुढं ढकलण्यास सांगितलं होतं. पत्रात आरोग्यमंत्र्यांनी ‘भारत जोडो यात्रे’मध्ये कोविडचा प्रसार होण्याची भीती व्यक्त केलीये. राजस्थानमध्ये सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेत कोविड मार्गदर्शक तत्त्वांचं काटेकोरपणे पालन करण्यात यावं, असं आरोग्यमंत्र्यांनी पत्रात लिहिलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.