Mantralaya News: मंत्रालयातील ५ अधिकाऱ्यांना महिनाभराच्या तुरुंगवासाची शिक्षा, काय आहे प्रकरण?

Mantralaya News
Mantralaya News
Updated on

Mantralaya News: मंत्रालयातील ५ वरिष्ठ अधिकाऱ्यांना मुंबई हायकोर्टाने मोठा दणका दिला आहे. या अधिकाऱ्यांना महिनाभराचा तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

यामध्ये मदत आणि पुनर्वसन खात्याच्या सचिवांचा सहभाग आहे. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करणे या अधिकाऱ्यांना महागात पडलं आहे.

मदत आणि पुनर्वसन खात्याच्या सचिव असिम गुप्ता यांच्यासह विजयसिंग देशमुख, उत्तम पाटील, प्रविण साळुंखे, तलाठी सचिन काळे यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. (Mantralaya latest news)

Mantralaya News
Mantralaya: मंत्रालयात चाकू घेऊन जाणाऱ्याला अटक! कोण आहे 'ही' व्यक्ती?

पुणे जिल्ह्यातील भूसंपादन प्रकरणात न्यायालयाच्या आदेशाच्या अवमान प्रकरणामध्ये हायकोर्टाने ही शिक्षा सुनावली आहे. मात्र सरकारी पक्षाने माफी मागितल्यानंतर शिक्षेला आठवड्याची स्थगिती देण्यात आली आहे.

शिक्षा रद्द करण्यास नकार देत न्यायालयानं प्रतिज्ञापत्र मागवलं आहे. या प्रकरणी आता ८ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. साम टीव्हीने याबाबत वृत्त दिले आहे.

Mantralaya News
One Nation One Election: 'एक देश, एक निवडणूक होणार?', केंद्रानं बोलावलं संसदेचे विशेष अधिवेशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.