'कानावर बंदुकीचे आवाज आणि हातात रंगांचे ब्रश....' विशेष मुलांच्या मदतीसाठी मराठमोळ्या सुमित पाटीलने गाठलं मणिपूर

मणिपूरबद्दल फक्त बोलण्याऐवजी तिथे जाण्याचा हिंमत दाखवणारे फारच कमी. मात्र मराठमोळ्या कलादिग्दर्शकाने सुमित पाटीलने ही हिंमत दाखवली, तिथल्या दिव्यांग (differently abled) दिलासा देण्यासाठी सुमित थेट मणिपूरला पोहोचला.
sumit patil helping differently abled children
sumit patil helping differently abled childrenE sakal
Updated on

मणिपूरमधील हिंसाचार थांबलेला नाही. दिवसाढवळ्या कुठे बंदुकीचे आवाज, कुठे जाळपोळ, कुठे मारहाण अशांतीचं पर्व तिथे सुरू आहे.

या वातावरणात सगळ्यात जास्त परिणाम होतो तो, महिला आणि मुलांवर. त्यामुळे तिथे जणू युद्धजन्य परिस्थितीच निर्माण झाली आहे.

आता ही परिस्थिती कुणी आणली, कुणी त्या आगीत तेल ओतलं, सरकार काय करत आहे, अशा सगळ्या मुद्द्यावर वाद-प्रतिवाद होत राहतील पण तिथल्या सामान्य नागरिकांना मदतीचा गरज आहे, हे सत्य तर नाकारता येणार नाही.

मणिपूरबद्दल बोलणारे अनेक आहेत पण तिथे जाऊन काम करणारे कमीच. त्यातही सध्याच्या परिस्थितीत तिथे जाण्याचं धाडस दाखवणं आणखीच कठीण आहे.

मात्र सुमित पाटील या मराठमोळ्या तरुणाने ही हिंमत दाखवली.

डोळ्यांसमोर घडणारा रक्तपात, हिंसा, जिवलगांचं जाणं हे सगळे धक्के मानवी मनासाठी भयंकर असतात आणि त्याच्या खुणा आयुष्यभर राहतात.

दिव्यांग मुलांची तर या वातावरणात आणखीच कोंडी झाली होती.

आधीच त्यांच्यातील काहीना काही शारीरिक अथवा मानसिक व्यंगामुळे त्यांच्या व्यक्त होण्याला मर्यादा, त्यातच विस्थापित व्हावं लागणं, घरापासून, रोजच्या परिसरापासून दूर असणं, बंदुकांचे सतत कानी पडणारे आवाज या सगळ्यामुळे ही मुलं अक्षरश: मिटून गेली होती.

 Amid the chaos differently abled Children needs special attention
Amid the chaos differently abled Children needs special attentionsumit patil

सुमित पाटील आपल्या श्रीरंग चॅरीटेबल ट्रस्ट या संस्थेतर्फे दिव्यांग, विशेष मुलांसाठी काम करतो.

त्याचं काम देशभर निरनिराळ्या ठिकाणी चालतं मात्र नुकताच तो पोहोचला होता मणिपूरमध्ये.

तिथल्या दिव्यांग मुलांच्या आयुष्यात रंग भरण्यासाठी, काही काळासाठी त्यांना आपलं दु:ख विसरून हसवण्यासाठी सुमित मणिपूरला पोहोचला.

sumit patil helping differently abled children
manipur violence : दोन महिन्यांपासून अशांत असलेलं मणिपूर हे नवं काश्मीर बनतंय का? या अशांतपर्वाचा घटनाक्रम जाणून घेऊया

झालं असं की मे महिन्यात सुमितला त्याच्या मणिपूरमधल्या एका मैत्रिणीकडून मदतीसाठी फोन आला. ही मैत्रिण तिथल्या दिव्यांग मुलांसाठी काम करत होती.

ती म्हणाली, मणिपूरमधली परिस्थिती इतकी बिघडलीय की ही सगळी दिव्यांग मुलं अक्षरश: मुकी होऊन गेली आहेत. काही संवादच साधत नाहीयेत.

सतत बंदुकांचे, ओरडण्याचे, विव्हळण्याचे आवाज ऐकून ही मुलं प्रचंड धास्तावली आहेत. आम्हाला त्यांना परत बोलतं करायचं आहे, त्यांच्याशी संवाद करायचा आहे तर तू काहीतरी उपाय सुचव.

सुमितने काही उपाय सुचवले पण त्यावर बऱ्याच मर्यादा होत्या. कारण त्यांच्यातला संवाद हा फक्त फोनवरुन होऊ शकत होता. इंटरनेट बंदी असल्याने या मुलांशी व्हिडीओ कॉलवरुन बोलणंही शक्य होत नव्हतं.

आता काय करायचं, हा प्रश्न होता.

sumit patil helping differently abled children
Rahul Gandhi : पंतप्रधान मणिपूरला का जात नाहीत, मला माहित आहे, पण...; राहुल गांधींचं मोठं विधान

आता या मुलांना मदत करायची असेल तर तिथे जाऊनच ते करणं शक्य होतं. त्यामुळे मनाशी निर्धार करून, सुमितने ऑगस्टमध्ये थेट मणिपूर गाठायचं ठरवलं.

त्यासाठी त्याला खंबीर साथ मिळाली ती मुंबईतील पियाइबाला आयाम, मिलिंद आडेलकर आणि संकेत जाधव यांची.

यातील पियाईबाला आयाम ही तर याच प्रदेशातील असल्याने तिला तेथील राजकीय, सामाजिक आणि भौगिलिक परिस्थितीची जाण होती. तर मिलिंद आणि संकेतने या कार्यशाळेतील डॉक्युमेंटेशनसाठी सुमितला मदत केली.

sumit patil helping differently abled children
Manipur Violence: मणिपूर का पेटलं, कुकी-मैतेई समाजांमध्ये काय बिनसलं? जाणून घ्या एका क्लिकवर...

मणिपूरला विमानतळावर उतरल्यापासूनच सुमितला इथे येण्याचा निर्णय किती बरोबर होता, हे जाणवू लागलं.

त्याला जायचं होतं. इम्फाळजवळील फुंकुंग या गावी.

तिथे पोहोचेपर्यंत प्रत्येक चौकात त्याला अनेक महिला भेटत होत्या. या सगळ्या माता होत्या, आपल्या मुलांसाठी कुणीतरी महाराष्ट्रासारख्या इतक्या लांबच्या प्रदेशातून आलं आहे, याचं कौतुक त्यांना होतं.

कधी न पाहिलेल्या सुमितचा त्यांना आधार वाटत होता, कारण तो त्यांच्या लेकरांसाठी आला होता.

कार्यशाळेकत मुलांना चित्राचे धडे देताना
कार्यशाळेकत मुलांना चित्राचे धडे देतानाsumit patil

सुमित शेवटी त्यांच्या कार्यशाळेच्या ठिकाणी म्हणजे, सोशल अँड हेल्थ डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनच्या ऑफिसमध्ये पोहोचला.

सुमित म्हणतो, तिथला माहौल काही वेगळाच होता. बातम्यांतून वाचलेली अशांतता म्हणजे काय हे मला कळत होतं. भीती काय असते, हे तिथल्या लोकांच्या चेहऱ्यांवरुन, त्यांच्या कहाण्यांतून कळत होतं.

sumit patil helping differently abled children
Rahul Gandhi: मणिपूरमधला तो प्रसंग मी कधीही विसरू शकत नाही.. राहुल गांधींनी सांगितली आठवण

या दिव्यांग मुलांना भेटल्यावर सुमितने सगळ्यात पहिलं काम काय केलं असेल तर मुलांना खाऊ दिला आणि मस्त मोठ्या आवाजात गाणी लावून या मुलांना नाचायला लावलं.

सुमितने खास राजगिऱ्याचे लाडू नेले होते. कारण एकतर हे लाडू गोड असतात आणि या मुलांना ते खायलाही सोपे जातात.

त्यानंतर रंग दिला. कागद दिला. त्यांच्याकडून रंगांचे खेळ घेतले.

सुमित मणिपूरमध्ये चार दिवस होता. त्यात तो अशा साधारण १०० मुलांना भेटला आणि त्यांच्यासोबत त्याने अनेक अॅक्टिव्हिटी केल्या.

फुंकुंग, तेजपूर, चिंगारेल, सावाँबंग येथील बिरामंगोल कॉलेज अशा अनेक ठिकाणी सुमितने भेट दिली आणि तिथल्या दिव्यांग विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांना मार्गदर्शन केले.

फक्त मुलंच नव्हे तर तिथल्या पालकांशीही सुमित बोलला, त्यांच्यासाठीही त्याने काही अॅक्टिव्हिटीज घेतल्या.

art is the only answer
art is the only answerSumit patil

या संपूर्ण अनुभवाबद्दल तो म्हणतो,

''माझ्यासाठी फार खास अनुभव होता. मणिपूरमध्ये परिस्थिती खरोखरच वाईट आहे.

अनेक नागरिक विस्थापित झाले आहेत, आपली घरं सोडून आले आहेत.

मुलांची अवस्था तर फारच वाईट आहे. सतत बंदुकीचे आवाज, हिंसा, रक्तपात या सगळ्यात त्यांचं बालपण हरवून गेलं आहे. रोजचं सवयीचं वातावरण हरवल्याने दिव्यांग मुलं अस्वस्थ झाली आहेत.

त्यामुळे त्यांचा जणू आवाजच हरवला आहे, पण कला हे साऱ्यावरचं उत्तर आहे. मी जेव्हा या मुलांकडे गेलो. तेव्हा मुलं तर खुश झालीच पण मी या मुलांसाठी तिथे आलो आहे, हे कळल्यावर त्यांचे पालकही मला प्रेमभराने भेटले.

तिथली राजकीय आणि सामाजिक परिस्थिती बिघडली आहेच. पण ज्या बिचाऱ्या निष्पाप मुलांना कधीकधी त्यांचं नावही सांगता येत नाही, अशा आमच्या दिव्यांग मुलांना त्याची शिक्षा का?

या वादात या मुलांचं आयुष्य भरडलं जात आहे. त्यांच्यासाठी मी तिथे गेलो. ''

यावेळी सुमितला तेथील संस्थेने एक प्रमाणपत्रही भेट दिलं. यानंतरही सुमित तिथल्या मुलांशी संपर्कात राहणार आहे, तसेच त्यातील काहींना मुंबईत किंवा मोठ्या शहरांत आणून त्यांना मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचाही त्याचा मानस आहे.

Manipur needs peace
Manipur needs peacesumit patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.