उत्तर प्रदेशातल्या शाळांत मराठीचे धडे; योगी सरकार विचारात

कृपाशंकर सिंह यांनी योगी सरकारला पत्र लिहित ही मागणी केली आहे.
school students
school studentssakal
Updated on

भाजपाचे नेते कृपाशंकर सिंह यांनी योगी सरकारला पत्र लिहित उत्तर प्रदेशातल्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवण्याची मागणी केली आहे. यामुळे उत्तर प्रदेशातल्या लोकांना महाराष्ट्रात नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध होतील, असंही या पत्रात म्हटलं आहे. विशेष बाब म्हणजे हा प्रस्ताव योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांच्या विचाराधीन आहे. प्रायोगिक तत्वावर वाराणसीच्या शाळांमध्ये याचा प्रयोग करणार असल्याची माहिती मिळत आहे.

सरकारी नोकरभरतीत मराठी आणि उत्तर भारतीय यावरून अनेक वर्षे वाद सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. पूर्वी काँग्रेसमध्ये असलेले आणि आता नुकतेच भाजपामध्ये आलेले कृपाशंकर सिंह (BJP leader Kripashankar Singh) यांनी उत्तर भारतीयांना महाराष्ट्रात सरकारी नोकरी मिळवण्याच्या संदर्भात ही मागणी केली आहे. पण आता बाहेरचे विद्यार्थी मराठीचं ज्ञान घेऊन इथं येऊ लागले, तर मग भूमिपुत्रांचं काय? यावरून वाद निर्माण होऊ शकतो. विशेष म्हणजे योगी सरकारही (Yogi Government) या प्रस्तावावर सकारात्मक विचार करत आहे.

Kripashankar Singh Letter
Kripashankar Singh LetterSakal

दरम्यान, मनसेने या निर्णयाचं स्वागत केलं आहे. मनसे नेते संदीप देशपांडे (MNS Leader Snadeep Deshpande) म्हणाले की, कोणी मराठी भाषा शिकावी, याबद्दल आमचं काहीही म्हणणं नाही. पण उत्तर प्रदेशातल्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवण्याचा निर्णय घेण्याऐवजी रोजगार निर्मितीवर काम करावं. जेणेकरून कोणालाही उठसूट नोकरी, रोजगारासाठी महाराष्ट्रात यावं लागणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.